नर्सरी, केजी 1, केजी 2 ची ऍडमिशन करा अवघ्या 1 हजार रुपयांमध्ये

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील मोक्षधाम रोडवर स्थित संताजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्ष 2023 ते 24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. संताजी येथे नर्सरी, केजी 1, केजी 2 या विद्यार्थ्यांना फक्त हजार रुपयात प्रवेश निश्चित करता येणार आहे. याचसह वर्ग 1 ते वर्ग 10 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. इतर इंग्लिश मिडीयम स्कूल पेक्षा अगदी अर्ध्या दरात सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संताजी इंग्लिश मीडियम स्कूल परिसरात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या वर्षी देखील संताजी इंग्लिश मीडियम स्कूलचा 10 वीचा निकाल 100 टक्के लागला आहे. तालुक्यातून अवघ्या 4 शाळांना हा मान मिळाला आहे. 

विद्यार्थ्यांसाठी सुविधा –
अगदी गावाच्या मध्यभागी शाळेची प्रशस्त इमारत. शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनुभव शिक्षक असून संपूर्ण क्लासरूम ही डिजिटल आहे. विद्यार्थ्यांना संगणकाचे संपूर्ण शिक्षण दिल्या जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी ऍक्टिव्हीटी हॉलची सुविधा आहे. खेळामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेत विविध इनडोअर व आऊटडोअर खेळ घेतल्या जातात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शाळाही सीसीटीव्ही सर्विलन्समध्ये आहे. वाचन कक्षाची व्यवस्था सोबतच लॅबोरेटरी ची व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी वाचन साहित्य उपलब्द आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम व वार्षिक स्नेहसंमेलनाचे देखील आयोजन करण्यात येते.

शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड व जन्म प्रमाणपत्र याची गरज आहे. शाळेत अवघ्या मोजक्या जागा शिल्लक असल्याने पालकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनाद्वारे करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पत्ता: संताजी इंग्लिश मीडियम स्कूल
संताजी चौक (सर्वोदय चौक) वणी.
संपर्क 9921222625, 7030511616, 9543970216

10 वीच्या परीक्षेत संताजी स्कूलचा 100 टक्के निकाल
नुकत्याच जाहीर झालेल्या 10 वी च्या निकालात संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल ने आपल्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेतील 44 विद्यार्थ्यांपैकी पूर्णच विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. यावर्षी संपूर्ण तालुक्यात अवघ्या 4 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यात संताजी इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव आहे. शाळेतून कु. समीक्षा दीपक भोंगळे हिने 89.60 गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर यश गजानन बोन्डे याने 88.80 गुण घेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. कु. सायली पंढरीनाथ महाकुलकर 86.20 गुण घेत तृतीय, तर कु. समीक्षा संतोष उटलावार व नहर सुधाकर विडूरकर यांनी चौथा व पाचवा क्रमांक पटकावला आहे.

विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रमेश येरने, उपाध्यक्ष ओमप्रकाश निमकर, सचिव धंनजय आंबटकर, सहसचिव तानाजी पाऊनकर, संजय पोटदुखे, दिलीप पडोळे, मंगेश येनूरकर, विलास क्षीरसागर, शोभा गंधारे, विवेक बुटले, खुशाल कतोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा कुरेकार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Comments are closed.