विवेक तोटेवार, वणी: आता आपलं दहावीपर्यंत असलेलं शालेय जीवन संपलं. पुढं चालून वर्गातल्या, शाळेतल्या जुन्या दोस्तांशी भेटगाठ होईल की नाही याची गॅरंटी नाही. शाळेतले दहावीचे विद्यार्थी त्यांच्या जुन्या आठवणींनी भारावलेले होते. त्यात संपूर्ण विश्वाची प्रेरणा असलेले आणि वीररसाचा जीवंत आरसा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती.
दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप आणि शिवजयंती या दोन्ही अत्यंत इमोशनल कार्यक्रमात निरव शांतता सर्वांच्या मनात कालवाकालव होत होती. शहरातील सर्वोदय चौक येथील संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हे दोन्ही सोहळे झालेत. 10 वीच्या विद्यार्थ्यांचे सत्र संपलेआहे. त्यांना आता पुढील शिक्षणासाठी ही शाळा सोडून महाविद्यालयात जावे लागणार आहे.
या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला. कार्यक्रमाची सुरुवात शारदा पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून झाली. कार्यक्रमात ओमप्रकाश निमकर, दिलीप पडोळे, शैलेश आडपावार यांनी विद्यार्थांना परीक्षेविषयी मार्गदर्शन केले.
राकेश दिकुंडवार व वैशाली कांबळे यांनी शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगितली. यावेळी विद्यार्थांना कार्डबोर्ड देऊन पुढील शिक्षणासाठी सदिच्छा दिल्यात. तर गायत्री परोधी, प्रगती कठाने या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केलेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल रामगिरवार तर उपस्थितांचे आभार हार्दिका गवारकर यांनी मानले.
Comments are closed.