रात्री साप निघाल्याचा कॉल… तरोड्याच्या सर्पमित्रांचे जीवदान

साप निघाल्यास 9850577616 या हेल्पलाईनवर कॉल करण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तरोडा (सुंदरनगर) येथे एका अजगराला रेस्क्यू केले. बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजताची वेळ असेल. तरोडा (सुंदरनगर) येथील काही नागरिकांना स्थानिक श्रीराम मंदिरात भला मोठा निघाल्याचे निदर्शनास आले. तरोडा येथील घनश्याम गोवरदिपे व सतीश वराटे यांनी तातडीने गावातीलच हेल्पिंग हँड या सर्पमित्रांच्या टीमला कॉल लावला. माहिती मिळताच सर्पमित्र अनिकेत कुमरे हे आपले सहकारी रमेश भादीकर व टीमला घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

टीमने पाहणी केली असता त्यांना सदर साप हा बिनविषारी पायथन (अजगर) असल्याचे कळले. त्याची लांबी 6 फूट होती. टीमने अवघ्या काही वेळातच अजगराला रेस्कू केले. त्यानंतर त्यांनी वनविभागाच्या मदतीने सापाला भालर जवळील जंगलात सोडण्यात आले. दरम्यान सर्पमित्रांनी उपस्थितांना अजगर बाबत संपूर्ण माहिती देत याबाबत जनजागृती केली.

साप निघाल्यास हेल्पलाईनला कॉल करा
MH29 हेल्पिंग हँडची टीम परिसरात सापांबद्दल जनजागृती करते. परिसरात विविध विषारी आणि बिनविषारी सापांना या टीमने रेस्क्यू करून जीवदान दिले आहे. परिसरात कुठेही साप निघाल्यास त्याला न मारता 9850577616 या हेल्पलाईनवर कॉल करण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी सर्पमित्र तथा वन्यजीव रक्षक रमेश भादिकर, राजू भोगेकर, अनिकेत कुमरे, रवी नन्नावरे, समीर गुरनुले, आशिष सोनटक्के, नितीन मानुसमारे इत्यादींची उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.