दोन महिन्यांपासून बंद असलेले सेतू केंद्र सुरू होईल काय?

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाधिकऱ्यांना निवेदन

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सेतू केंद्र गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. याच आशयाचे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना वणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत दिले.

तहसील परिसरातील सेतू केंद्र गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. हे सेतू केंद्र बंद असल्याने नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागतील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. सोबतच अधिकचा आर्थिक भूदंड सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना नाहकच पायपीट करावी लागत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सेतू केंद्र बंद असल्याने शासकीय कागदपत्रे काढण्यास त्रास होत आहे. हा त्रास गेल्या दोन महिन्यापासून वणीकर जनतेला सहन करावा लागत आहे. सेतू केंद्र लवकरच पूर्ववत सुरू करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Comments are closed.