शाळकरी मुलीवर तरुणाचा अत्याचार, मुलगी 7 महिन्यांची गर्भवती

आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, होणार डीएनए चाचणी

जितेंद्र कोठारी, वणी: ती अल्पवयीन होती. मात्र त्याची कोणतीही तमा न बाळगता आरोपीने तिचे शारीरिक शोषण केले. त्यातच ती गर्भवती राहिली. मुलीच्या कुटुंबीयांच्या तिच्या शरीरातील बदल लक्षात आले. जेव्हा त्या मुलीची वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा मात्र तिच्या कुटुंबींयांच्या पायाखालची वाळूच सरकली. ती 7 महिन्यांची गर्भवती होती. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून मुलीचे तिचे शोषण केल्याचे समोर आले. शिरपूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अल्पवयीन मुलीवर बळजबरी मातृत्त्व लादणा-या आरोपीला तात्काळ गजाआड केले.

सविस्तर वृत्त असे की पीडित अल्पवयीन मुलगी (17) ही शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या एका गावातील रहिवाशी आहे. ती 10 व्या वर्गात शिकते. आरोपी अविनाश टेकाम (25) याच्यासोबत तिची ओळख होती. आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. काही दिवसांनी आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत मुलीचे शारीरिक शोषण करण्यास सुरूवात केली. त्यातच ती गर्भवती राहिली. मात्र म्हणतात ना की कोणतीही गोष्ट खूप काळ लपवणे कठिण असते. मुलीच्या कुटुंबीयांना मुलीमध्ये होणारे बदल लक्षात आले. त्यांनी शुक्रवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती 7 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.

कुटुंबियांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा तिने आरोपी अविनाश हा अनेक महिन्यांपाासून दुष्कर्म करीत असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. हादरलेल्या कुटुंबीयांनी तात्काळ मुलीला घेऊन शिरपूर पोलीस स्टेशन गाठले. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे हकीकत जाणून गुन्हा नोंद करण्या करीता वणी पोलीस स्टेशन येथून एपीआय माया चाटसे यांना बोलावण्यात आले. याबाबत मुलीचे बयान नोंदवण्यात आले.

पोलिसांनी आरोपी अविनाश टेकाम (25) विरुद्ध भादंविच्या कलम 376 (2) (N), 354 (अ) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम (पोस्को) च्या कलम 4,6,8 अनव्ये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच ठाणेदार गजानन करेवाड यांनी तात्काळ आरोपी अविनाशला गजाआड केले.

आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी
शिरपूर पोलिसांनी आज शनिवारी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी आरोपीला केळापूर सत्र न्यायालयात हजर केले. कोर्टाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकऱणाची सखोल चौकशीसाठी आरोपीची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजानन करेवाड, सपोनि माया चाटसे, पीएसआय राम कांडुरे यांनी केली. पुढील तपास पीएसआय राम कांडुरे करीत आहे.

हे देखील वाचा:

शेतकरी महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

आधी वस्तूंचा डेमो बघा, नंतरच वस्तू खरेदी करा

Comments are closed.