वणी येथे ‘शब्दालय वक्तृत्व कौशल्य शिबिर – २०२६

१२ दिवसांत बना प्रभावी वक्ता! सर्व वयोगटांसाठी सुवर्णसंधी

बहुगुणी डेस्क, वणी: प्रभावी वक्तृत्व हे व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे कौशल्य मानले जाते. अनेक दमदार वक्त्यांना पाहून “आपणही असं बोलू शकलो तर?” असा विचार अनेकांच्या मनात येतो. अशाच इच्छुकांसाठी वणी येथे ‘शब्दालय वक्तृत्व कौशल्य शिबिर – 2026’ या विशेष उन्हाळी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराची सुरुवात 26 एप्रिलपासून होणार आहे.

हे 12 दिवसांचे शिबिर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी खुले असून, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी तसेच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. योग्य मार्गदर्शन आणि नियमित सरावाच्या माध्यमातून सहभागींचा आत्मविश्वास वाढवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.

शिबिरात प्रभावी भाषण कसे करावे, स्टेज डेअरिंग (सभाधीटपणा) कसा वाढवावा, आवाज व शब्दफेक सुधारणा, देहबोली, तसेच भाषण लेखन कौशल्य यावर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय राजकीय व सामाजिक विषयांवरील भाषण, सूत्रसंचालन, प्रास्ताविक, आभार प्रदर्शन, विविध समारंभांतील भाषण, प्रचार सभा, चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्याने तसेच वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक तंत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दररोज 2 ते3 तासांचे प्रात्यक्षिक व सरावाधारित प्रशिक्षण देण्यात येणार असून, सहभागींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

हे शिबिर के.व्ही.सी. हाइट्स, टागोर चौक, वणी (नवीन महाराष्ट्र बँकेच्या वरच्या मजल्यावर) येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे प्रशिक्षण युवा वक्त्या व यशस्वी वादविवादपटू प्रतीक्षा गुरनुले देणार असून, त्यांनी राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली आहेत. त्या सामाजिक व्याख्यात्या म्हणूनही परिचित आहेत. त्यांनी एम.ए. (राज्यशास्त्र), SET तसेच एम.ए. (तत्त्वज्ञान) ही शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे.

इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 8605428847 किंवा 8766977922 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Comments are closed.