शांताबाई अजाबराव गाडगे यांचे अल्पशा आजाराने निधन
रामपुरा येथील राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा
बहुगुणी डेस्क, वणी: रामपुरा वॉर्ड, वणी येथील रहिवासी शांताबाई अजाबराव गाडगे (वय 76) यांचे सोमवारी दिनांक 21 जुलै 2025 रोजी रात्री 9 वाजता अल्प आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर महिनाभारपासून सावंगी वर्धा येथे उपचार सुरु होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी, 22 जुलै 2025 रोजी वणीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार असून, अंत्ययात्रा रामपुरा वॉर्ड येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. पतीच्या अकाली निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शांताबाई यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.


Comments are closed.