वणीतील विनोद मुत्यलवार यांचे पचमढी येथे हृदयविकाराने निधन

देवदर्शनाला गेले असता पहाटे आला हृदयविकाराचा धक्का

बहुगुणी डेस्क, वणी: कनकवाडी, वणी येथील रहिवासी विनोद गोविंदराव मुत्यलवार (वय 53) यांचे आज मंगळवारी, 22 जुलै रोजी पहाटे पचमढी येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विनोद मुत्यलवार यांची सौम्य, मितभाषी आणि सोज्वळ स्वभावाचे धनी अशी ओळख होती. त्यांचे शिवतीर्थ कॉम्प्लेक्स, टिळक चौक येथे सायकल व मोटारसायकल रिपेअरिंगचे दुकान होते. ते आपल्या मुलासह पंचमढी येथे देवदर्शनासाठी गेले होते. मात्र, तिथे पहाटे अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. विनोद मुत्यलवार यांच्या निधनाने वणीने मनमिळावू व्यक्तिमत्त्व गमावले अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Comments are closed.