साठ ते सत्तर गावांतील ग्रामस्थ रस्त्याअभावी भोगत आहेत यातना

शिवसेना (उ.बा.ठा.) शिरपूर ते आबई फाटा रस्त्यासाठी आक्रमक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रस्ते म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या, धमण्या असतात. मात्र त्याच खंडीत झाल्या की, देशाचा व पर्यायाने ग्रामीण भागांचा विकास मंदावतो. हीच बाब यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या शिरपूर ते आबई फाटा रस्त्याची झाली आहे.

हा चार किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. यावरून वाहन चालवणे तर दूरच, पायी चालणेदेखील अवघड झाले आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. मागील तीन दशकांपासून परिसरातील किमान साठ ते सत्तर गावांतील ग्रामस्थांना मार्गक्रमण करताना यातना सहन कराव्या लागत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

म्हणूनच शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वाद बांधकाम उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले. शिरपूर-आबाई ह्या रस्त्यावर असलेल्या खड्यांनी वाहन चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागतात. किरकोळ अपघात ही तर नित्याची बाब झाली आहे. कोळसा वाहतूकीच्या धुळीमुळे दुतर्फा असलेल्या शेतांतील पिकांची उत्पादन क्षमता पूर्णतः घटली आहे.

शिरपूर ते आबई हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे 24 तास वाहनांची वर्दळ या मार्गावरून असते. परंतु वणी ते चारगाव चौकीदरम्यान मार्ग प्रमुख राज्य महामार्ग 6, चारगाव चौकी ते आबई फाटा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक 317 व आबई फाटा ते कोरपना मार्ग राज्यमहामार्ग क्रमांक 474 मध्ये वर्गीकृत झाला आहे.

शिरपूर ते आबई फाटा या चार किलोमीटर लांबीच्या मार्गावरील खड्डे जीवघेणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवजड वाहनांची सातत्याने होणारी वर्दळ प्रदूषणात भर टाकत आहे. परिसरातील नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता, शासनाने तातडीने रस्त्याच्या वहन क्षमतेनुसार बांधकाम आठ दिवसांत सुरू करावे. अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेव ठाकरे) पक्ष स्थानिक नागरिकांना सोबत घेत आ. संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडेल.

यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास सर्वस्वी संबंधित विभाग जबाबदार राहणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी शिवसेना उजिल्हाप्रमुख संजय निखाडे , विधानसभा संघटक सुनील कातकडे, माजी नगरसेवक राजू तुरणकर, संतोष कुचनकर, प्रवीण खानझोडे, अजय चन्ने, प्रकाश कऱ्हाड, स्वप्निल ताजने, भगवान मोहिते, सतीश भटगरे उपस्थित होते.

Comments are closed.