शुक्रवारी संध्याकाळी शिरपूर येथे शाळा व विद्यार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सोलो व समूहनृत्याचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आंतर शालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दिनांक 16 जानेवारीला संध्या 6.30 वाजेपासून शिरपूर येथील शासकीय मैदान येथे ही स्पर्धा होणार आहे. चार गटात ही स्पर्धा होणार असून यात पूर्व माध्यमिक गट, नर्सरी, केजी, अंगणवाडी. प्राथमिक गट यात वर्ग 1 ते 5, उच्च माध्यमिक गट यात वर्ग 6 ते 8 तर चौथा गट माध्यमिक गट आहे. यात वर्ग 9 ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाच्या अंगी असलेल्या नृत्यकलेला स्पर्धात्मक संधी मिळावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे. सांस्कृतिक कला मंच तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे नियम व अटी
स्पर्धा केवळ परिसरातील ग्रामीण भागातील शाळा व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. यात शिरपूर, शिंदोला, कायर, पुनवट सर्कलमधल्या शाळा व विद्यार्थी भाग घेऊ शकतात. एका शाळेला एकापेक्षा अधिक गटात भाग घेता येणार आहे. समूहनृत्यात किमान 12 विद्यार्थी हवे, प्रत्येक गटात एका शाळेला एक तर एका सामुहिक गटात सहभागी होता येईल. सोलो नृत्यात एका विद्यार्थ्याला एका गटात प्रवेश घेता येईल. गाणे लोकगीत अथवा देशभक्तीपर असणे गरजेचे आहे. पहिल्या तीन नृत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धक, विद्यार्थी व दोन शिक्षकांची जेवणाची व्यवस्था राहील.

अधिक माहितीसाठी संपर्क – सतिश एकरे, 8308224040, धीरज डाहुले- 9823090983, रमेश पाचभाई 9545701642, पवन घोंगे – 9552660992 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments are closed.