छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू – डॉ. रेखा बडोदेकर

लोकमान्य टिळक महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

जितेंद्र कोठारी, वणी:  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य व सुरक्षा मिळवुन दिली. सरंजामशाहीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनीं स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्यात परस्त्री आणि परधर्माची अवहेलना करणाऱ्यांची गय केली जात नव्हती.  जनतेचा हित जपणारा राजा व शेतकऱ्यांच्या काडीलाही धक्का न लागू देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होता. असे प्रतिपादन लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी  येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. रेखा बडोदेकर यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळक महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि समाजशास्त्र विभागातर्फे शनिवार 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती प्रसंगी व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालीत लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रमाधिकारी व  समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नीलिमा दवणे या होत्या. स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणी आणि आव्हाने महाराजांनी मोठ्या शिताफीने व चतुराईने सांभाळली. तरुणाने समोर असणारे आव्हाने कशी स्वीकारावी आणि त्यातून मार्ग कसा काढायचा याचं ज्ञान या थोर पुरषांच्या जिवन चरित्रा मधून मिळते. महाराजांच्या चरित्रा मधून विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्त्व घडवावे व आपल्या विचारात या थोर पुरषांना जिवंत ठेवावे.  असे मत डॉ. नीलिमा दवणे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. किशन घोगरे यांनी केले तर आभार वैष्णवी निखाडे हिने मानले.

Comments are closed.