वणीत शिवजयंती जल्लोषात साजरी, विविध उपक्रमांनी राजेंना अभिवादन

ढोल पथकाने वेधले उपस्थितांचे लक्ष... आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, इजहार शेख, विश्वास नांदेकर, संजय देरकर यांनी केले अभिवादन

विवेक तोटेवार, वणी: रयतेचे राजे छ. शिवाजी महाराज यांची जयंती वणीत जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त सकाळपासूनच शिवभक्तांनी शिवतीर्थावर जाऊन छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. दिवसभरात विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. जयंती निमित्त शहरात विविध स्पर्धा, व्याख्यान, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवतीर्थ (छ. शिवाजी महाराज पुतळा) हा परिसर रांगोळी आणि फुलांच्या आरासांनी सजवला होता. इथे वणीतील ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या पथकात मुलींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

काँग्रेसतर्फे अभिवादन
काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांच्याद्वारे वणीतील शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नुकतेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले संतोष पारखी, चेतन राऊत, रवी गुप्ता, करण ठाकूर, संदीप मुत्यलवार उपस्थित होते.

स्त्री शक्तीचे महाराजांना अभिवादन
सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन व महिला ओबीसी कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वृषाली खानझोडे, माया आसुटकर, सुरेखा हरडे, वैशाली देठे, मीनाक्षी मोहिते, सुरेखा ढेंगळे, अर्चना पिदूरकर., शारदा ढेंगळे, रेखा रासेकर, सविता राजूरकर, स्नेहा लालसरे, उज्वला लोखंडे, वेणू झाडे, अरुणा जाधव, अर्चना झाडे, मंजुषा ताटकोंडावार, नलिनी जेवूरकर, निशा ढूमणे, स्मिता झाडे, प्रणाली चिडे. कांचन देरकर, पूजा जुनगरी, प्रतीक्षा झट्टे उपस्थित होत्या.

नि:स्वार्थ सेवा तर्फे रक्तदान शिबिर
शहरातील नि:स्वार्थ सेवा 24 तास या गृपतर्फे शिवतीर्थावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला सर्वसामान्यांने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात 116 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरासाठी हितेश गोडे, अमोल धानोरकर, अनिल रेभे, योगेश आवारी, राजू चौधरी, गोविंदा नरपांडे, नीलेश होले, विलास आवारी, प्रकाश व-हाटे, विक्की बाप्पावार यांनी परिश्रम घेतले.

शहरात ठिकठिकाणी शिवभोजनाचे आयोजन
दीपक टॉकीज परिसरातील ए.आर. पान मटेरियल & किराणा येथे अरुण बोढेकर व अमोल बोढेकर यांच्या तर्फे शिव जयंती निमित्त भोजनदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. तर बालाजी ज्वेलर्स समोर व बाजोरिया लॉन जवळील महाराष्ट्र पान कॉर्नर जवळ भव्य शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले.

ढोलपथकाने वेढले उपस्थितांचे लक्ष… पाहा व्हि़डीओ…

Comments are closed.