वेस्टइंडीज ते ‘वणी’ सीताफळांचा 600 वर्षांचा प्रवास!

दिवाळीपर्यंत चालणार सीताफळांचा सीझन

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः सीताफळ हे वेस्ट इंडीज आणि दक्षिण अमेरिकतलं फळ आहे. ते कालांतराने भारतात आलं. पोर्तुगीजांनी जवळपास 600 वर्षांपूर्वी पंधराव्या शतकाच्या अखेरीस हे फळ भारतात आणले. सीताफळं वणीमार्गे चंद्रपूर, घुग्गूस, पांढरकवडा, मुकुटबन याही भागांत जातात. वणीतही सीताफळांना चांगली डिमांड असते.

यंदा मात्र ही मागणी थोडी कमी-जास्त आहे.भारतातल्या विविध भागांतून सीताफळ मार्केटला आलेत. वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यासह विविध भागांतील रसिक खवय्यांना सीताफळं तृप्त करीत आहेत. केजीएन फ्रूट कंपनीचे संचालक मोहंमद एजाज यांनी ही माहिती ‘वणी बहुगुणी’ला दिली.

हे निसर्गांचं देणं

सीताफळ ने एनोनसी कुळातील आहे. याला संस्कृतमध्ये ग्रीष्मजा, इंग्रजीत कस्टर्ड अॅपल, स्वीट सॉप, ॲनोना स्कॅ्वमोजा किंवा शुगर अॅपल म्हणतात. याचं शास्त्रीय नाव ‘आमोना रेटिकुलहा’ आहे. सीताफळाला विविध भाषांमध्ये विविध नावं आहे. हे शरीफा, अनुरम, अमृतफल, दुरगी, बहुबीजक, कृष्णबीज याही नावांनी ओळखलं जातं. हे निसर्गांचं देणं आहे.

मुरमाड जमिनीतही याचं उत्पादन चांगलं येतं. याची पानं सहसा जनावर खात नाहीत. त्याला कीडही लागत नाही. कंधार, लोहा आणि मुखेड तालुका सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. किंबहुना इथली सीताफळं विदेशातही जातात. या भागांत मोठ्या प्रमाणात सीताफळं येतात. ही झाडं शक्यतो जंगलातलीच असतात. शेतकरी किंवा परिसरातले लोक तोडून ते विकतात.

नांदेड पाठोपाठ अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी इथली सीताफळं सर्वत्र जातात. त्यासोबतच आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, बिहार इथूनही सीताफळं येतात. बीड, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, सासवड, शिरूर, धारूर, नळदुर्ग, दौलताबाद परिसरात सीताफळ मुबलक आहेत.

किरण यन्नावार, नांदेड

 

यंदा सीताफळांची आवक जास्त आहे. यंदा 60 ते 70 कॅरेट असा माल येतोय. साधारणतः ऑक्टोबर ते दिवाळीपर्यंत हा सिझन चालतो. या काळांतल्या विविध पूजांमध्येही सीताफळं हमखास दिसतात. आंब्यात किंवा अन्य फळांमध्ये विविध जाती आपल्याला दिसतात. तोतापुरी, हापूस, लंगडा या जाती आंब्यात असतात. सीतांफळांमध्ये गावरानी ब्रॅण्डच जास्त प्रिय आहे. तरीही त्यात 40 ते 50 प्रजाती आहेत. सीताफळाच्या जवळपास 120 प्रजाती सांगितल्या जातात.

सीताफळात पोटॅशियम आणि मॅगनेशियम विपुल प्रमाणात आढळतात. यात कॅल्शियम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमीन सी, बी 1 आणि बी 2 आहे. प्रोटीन्स, मेद, तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ आणि फलशर्कराही म्हणजेच फ्रुक्टोजही यात असते. सीताफळ हे गोड, थंड, कफवर्धक, पोष्टिक, बलवर्धक, पित्तशामक असतं. लघवीच्या विविध समस्यांवर सीताफळाची मुळी गुणकारी असते. केसांसाठी याची पानं, मुळी हे विविध घटकही उपयुक्त ठरतात.

सीताफळ औषधीगुणांनी युक्त आहे. याने शरीरातील उष्णता कमी होते. आम्पपित्त, अरूची, पोटात अथवा छातीतील जळजळ याव हे गुणकारी आहे. सीताफळ शक्यतो दुपारच्या वेळी खावे असं सांगितलं जातं. काही जणांना सीताफळ बाधक ठरू शकतं. डायबेटीजवाल्यांनी सीताफळ टाळावं. बैठकीचे काम करणाऱ्यांचा लठ्ठपणा सीताफळामुळे वाढू शकतो. सीताफळाचा सिझन सध्या सुरू आहे. किरकोळ बाजारात या मधाळ आणि गुणी फळाचा आस्वाद घ्यायला काही हरकत नाही.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.