स्माईल फाउंडेशनच्या उन्हाळी शिबिराचा थाटात समारोप

प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण

बहुगुण डेस्क, वणी: स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी घेतलेल्या उन्हाळी शिबिराचा शिबिराचा समारोप श्री विनायक मंगल कार्यालय येथे झाला. शिबिराच्या समारोपाला सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रमेश बोबडे, किरण दिकुंडवार, प्रफुल्ल खिवंसरा, मनीष कोंडावार, कुणाल आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांतर्फे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात 250 मुलांनी सहभाग घेतला. गुरुनगर, टागोर चौक, आनंदनगर, छोरिया लेआउट, नगरपरिषद शाळा क्रमांक पाच इथेही हे शिबीर झालं. या शिबिरात स्पोकन इंग्लिश, व्यक्तिमत्व विकास, वक्तृत्वकला, वाचन कौशल्य लेखन कौशल्य वृत्तपत्र वाचन व्याकरण संवाद कौशल्य पब्लिक स्पिकिंग आउटडोर गेम्स फन अँड लर्न असे अनेक उपक्रम झाले. तज्ज्ञ शिक्षक, व्यावसायिक प्रशिक्षकांनी शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

शिबिरात उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून आदर्श डांगे याला प्रथम तर खुशी देठे, पूर्वा कुचनकर यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. शिबिरात रोज विविध खेळ झाले. हे शिबिर आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत होतं. अशा 170 विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या यशासाठी पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदराणी, उत्कर्ष धांडे, गौरव कोरडे, रोहित ओझा, रौनक बदखल, सिद्धार्थ साठे आदींनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.