22 वर्षांनंतर एकत्र आलेत वर्गमित्र… रंगला स्नेहमिलन सोहळा

निसर्गरम्य वातावरणात जुन्या आठवणी, किस्से यांना उजाळा

बहुगुणी डेस्क, वणी: शाळा संपली… कुणी कॉलेज करण्यासाठी गाव सोडले… कुणी शेतीत रमले… कुणी व्यवसायात गुंतले… तर कुणी नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरात गेले व तिथेच स्थायिक झाले… मात्र 22 वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांच्यातील मैत्रीचा ओलावा मात्र कायम राहिला… शाळेत वर्गमित्रांशी जुळलेली नाळ तशीच राहावी… सर्वांनी पुन्हा एकदा भेटावे… एकमेकांबाबत जाणून घ्यावे… हितगुज करावे यासाठी उकणी येथील वर्गमित्रांचा वरझडी बंडा येथे स्नेहमिलन सोहळा रंगला.

उकणी येथे नवभारत हायस्कूल आहे. या शाळेत उकणी तसेच आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी शिकतात. सण 2002 मध्ये दहावीला असलेल्या विद्यार्थी दहावीनंतर विविध कारणांनी विखूरले. मात्र यातील काही लोक 22 वर्षांनंतरही मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात होते. त्यातून सर्वांनी एकत्र येण्याची कल्पना पुढे आली. आपल्या जुन्या सवंगड्यांना शोधण्यास सुरुवात झाली. अखेर सर्व जुने मित्र जुळल्यावर माजी विद्यार्थ्यांचा स्नेममिलन सोहळा करण्याचे ठरले. त्यासाठी वरझडी बंडा हे निसर्गरम्य ठिकाणही ठरवण्यात आले.

या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना, किस्से कहाणींना उजाळा देत एकमेकांशी मनमोकळा संवाद साधला. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावलीचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वरुची भोजाने कार्यक्रमाची सांगता झाली. लवकरच भेटुया या अभिवचानाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. मेळाव्याचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम मारुती रासेकर, सचिन बबनराव रामटेके, पुरुषोत्तम कृष्णाजी पाचभाई यांनी केले. तर उपस्थितांचे आभार महेश राघोजी रोडे, रवी अरुण लाड, मनीष घनश्याम खाडे, यांनी मानले.

कार्यक्रमाला नागेश मारुती बडवाईक, मोहन सूर्यभान धांडे, नंदकिशोर सुधाकर ढवळे, विठोबा महादेव ढवळे, सोमेश्वर नानाजी धपकस, संजय अरुण जीवतोडे, संजय कृष्णाजी खाडे, मनीष घनश्याम खाडे, राजकुमार गणपत खापणे, डॉ. अनिल शंकर कातरकर, प्रदीप गणपत कातरकर, रवी अरुण लाड, दिनेश नानाजी मांडवकर, पुरुषोत्तम कृष्णाजी पाचभाई,

सचीन बबन रामटेके, पुरुषोत्तम मारुती रासेकर, महेश राघोजी रोडे, संजय नामदेव वासनकर, सतीश रमेश ढेंगळे, नरेंद्र नामदेव गोहोकार, सचिन बबनराव झिले, गजानन खाडे, महादेव जुनघरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोमेश्वर नानाजी धपकस, राजकुमार गणपत खापणे, दिनेश नानाजी मांडवकर, संजय नामदेव वासनकर, प्रदीप गणपत कातरकर यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.