भारतीय पंडिताविरुद्द सोशल मीडियावर अभद्र टीका, पोलिसात तक्रार

वणी भाजपतर्फे कारवाईची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमा रिलीज झाल्यानंतर पंडित समुदायवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या वणी येथील व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. वणी शहर भारतीय जनता पक्षातर्फे ठाणेदार रामकृष्ण महल्ले याना तक्रार देऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

भारतीय पंडितांचे डीएनए भारताशी जुळत नसून तर युरेशियन आहे. अशी आक्षेपार्ह पोस्ट वणी येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केली होती. अभद्र भाषेत करण्यात आलेल्या या पोस्टमुळे ब्राहमण समुदायाचीच नव्हे तर समग्र हिंदू समाजाची भावना दुखावल्या गेल्या आहे. त्यामुळे अश्या समाजकंटकावर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

तक्रार देताना तारेंद्र बोर्डे, रवि बेलूरकर, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, संतोष डंभारे, आरती वांढरे, प्रीती बिडकर, नितीन वासेकर, अवि आवारी तसेच भाजपा वणी तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Comments are closed.