विवेक तोटेवार, वणी: स्वर्गीय गणपतराव आडपावार यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविवार, दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 8 वाजेपर्यंत संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल, वणी येथे गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मराठी आणि हिंदी भाषेतील भजन, गोंधळ, गवळण, अभंग आणि सिनेमातील गीते गाण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. ही स्पर्धा दोन गटात विभागली असून यातील एक गट हा 5 ते 15 व दुसरा गट 16 ते अधिक असा आहे. या स्पर्धकांसाठी स्मृतिचिन्ह व रोख अशा स्वरूपाचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व रोख देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अ गटात प्रथम बक्षीस 5000 रुपये स्वर्गीय श्री फकिरा चंपतराव नेवारे स्मृती प्रीत्यर्थ विशाल नेवारे यांच्याकडून देण्यात येईल. द्वितीय बक्षीस 3000 रुपये स्वर्गीय संजय बापुराव परसावार यांच्या स्मृती प्रीत्यर्थ प्रथमेश परसावार यांच्याकडून देण्यात येईल. तर तृतीय बक्षीस 2000 रुपये स्वर्गीय द्वारका गुणवंत पावडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ नरेंद्र पावडे यांच्याकडून देण्यात येईल. प्रोत्साहनपर बक्षीस स्वर्गीय मधुकर देवाजी भोंगळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ राजू भोंगळे यांच्याकडून व दुसरे बक्षीस नारायण आशन्नाजी मुठ्ठावार यांच्या स्मृती प्रीत्यर्थ अमर मुठ्ठावार यांच्या कडून देण्यात येईल.
(ब) गटात 16 ते पुढील वयोगटातील स्पर्धकांना भाग घेता येणार आहे. या वयोगटातील स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर असलेल्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व रोख देऊन गौरविण्यात येणार आहे. तर 4 व 5 क्रमांकावरील स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला 7000 रुपये स्वर्गीय श्री मोरेश्वर लांबट सर स्मृतिप्रीत्यर्थ सारंग लांबट.2000 यांच्याकडून, स्व श्री विष्णूपंत रामगिरवार गुरुजी संतोष रामगिरवार 2000, स्व श्री कुंजनप्रसाद पांडे सुधीर पांडे 2000 स्व सौ.सुरेखा सुरेशराव शेंडे स्वप्निल शेंडे 1000 यांच्याकडून देण्यात येईल.
द्वितीय क्रमांकावर असलेल्या स्पर्धकाला बक्षीस 5000 रुपये स्व श्रीमती इंदुताई प्रभाकरराव पदमावार यांच्या स्मृती प्रीत्यर्थ संतोष पदमावार व स्व श्री गोविंदराव राजेश्वर तंगडपलल्लीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निर्मला गोविंदराव तंगडपलल्लीवार यांच्यातर्फे तर तृतीय क्रमांकावर असलेल्या स्पर्धकाला 3000 रुपये बक्षीस स्व.सुरेखा सुरेश शेंडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सुधीर शेंडे यांच्याकडून देण्यात येईल. या व्यतिरिक चौथ्या व पाचव्या क्रमांकावर असलेल्या स्पर्धकाला प्रोत्साहनपर बक्षीस 500 रुपये स्व छबूताई नारायणराव मुठ्ठावार यांच्या स्मृती प्रीत्यर्थ अमर मुठ्ठावार यांच्या तर्फे व 500 स्व सौ शशिकला मधुकरराव भोंगळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ मनोज भोंगळे यांच्या कडून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून ह. भ. प. डॉ दामोदरराव आवरी, नामदेवराव ससाणे व सौरभ लांबट राहणार आहे. बक्षीस वितरण पुष्पा गणपत आडपावार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
बक्षीस वितरण पुष्पा गणपत आडपावार यांच्या हस्ते होईल, तर सत्कारमूर्ती म्हणून ह. भ. प. डॉ. दामोदरराव आवरी, नामदेवराव ससाणे आणि सौरभ लांबट उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचे आयोजन शैलेश आडपावार आणि संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. स्पर्धकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 7 मे 2025 रोजी गणपतराव आडपावार यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.




Comments are closed.