जिल्हाधिका-यांचा आदेश धडकला, अन् अनेक उमेदवारांचा हिरमोड

प्रभाग 5, 6, 14 च्या निवडणूकीला स्थगिती

भास्कर राऊत, मारेगाव: नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. आणि नामांकन दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या घटकाला न्यायलयाने दिलेल्या निर्णयाचा आदेश तहसिल कार्यालयात येऊन धडकला आणि अनेकांच्या चेहऱ्यावर नाराजीचे सूर उमटले. दरम्यान मारेगावात 14 जागांसाठी 97 नामांकन भरण्यात आले तर प्रभाग 5, 6, 14 च्या निवडणूकीला स्थगिती मिळाली आहे.

मंगळवारी नगरपंचायत निवडणुकांचा नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्व उमेदवारांची नामांकन दाखल करण्याची लगबग सुरू होती. जो तो वेळेच्या आत आपला नामांकन अर्ज दाखल झाला पाहिजे या गडबडीत. अशातच सुमारे 4 वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक आदेश धडकला आणि नामांकन दाखल करणाऱ्या काही चेहऱ्यावर नाराजी पसरली. कारण न्यायालयाने ओबीसींच्या आरक्षणावर हरकत घेत नागरिकांच्या मागास प्रवर्गातील जागांवरील निवडणूकीला निवडणूक आयोगाने पुढील आदेश येईपर्यंत स्थगीती दिली.

नामांकन दाखल करण्यासाठी एवढा खटाटोप केला. जुळत नसलेले कागदपत्रे वेळेआधीच पूर्ण केले. आणि ऐन वेळेवर या प्रवर्गातील निवडणूक रद्द झाल्याने उमेदवारांचा हिरमोड झालेला आहे. मारेगाव नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक 5 मधील नामाप्र महिला, 6 मध्येही नामाप्र महिला, आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये नामाप्र असे आरक्षण होते. त्यापैकी आता प्रभाग क्रमांक 5, 6 आणि 14 सोडून इतर 14 प्रभागासाठी निवडणूक होणार आहेत. तीन प्रभागातील इच्छुक उमेदवारांचा मात्र या निर्णयामुळे चांगलाच हिरमोड झाला आहे.

हे देखील वाचा:

वणीत एसटीच्या सोमवारी 3 तर मंगळवारी 7 फे-या

सुकनेगाव शिवारात वाघाचा बैलावर हल्ला

Comments are closed.