सलून चालकावर दगडाने हल्ला, सावर्ला येथील घटना

जुन्या वादाचा हल्ला करून काढला वचपा

जितेंद्र कोठारी, वणी: जुन्या रागाचा वचपा काढत एकावर दगडाने हल्ला केल्याची घटना सावर्ला येथे घडली. या हल्ल्यात सलून चालक जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी आरोपीवर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की संतोष अजाबराव दहिवलकर हे सावर्ला येथील रहिवाशी आहे. त्यांचे गावातच सलून आहे. काही दिवसांआधी गावातील रहिवाशी असलेला संतोष पुंडलिक तुराणकर (40) हा दारू पिऊन दहिवलकर यांच्या सलून मध्ये आला होता. तिथे त्याने ग्राहकांशी वाद घातला होता. त्यावरून दुकान मालकाने आरोपी संतोष यास हटकले होते. त्याचा राग आरोपी संतोष तुराणकरने धरून ठेवला होता.

सोमवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास दहिवलकर हे गावातील एका पानटपरीवर मित्रांसह बसून होते. दरम्यान तिथे आरोपी संतोष आला. तिथे त्याने दहिवलकर यांच्यासोबत वाद घातला. वादातून आरोपीने दहिवलकर यांना दगड फेकून मारला.

Ankush mobile

दगड दहिवलकर यांच्या डोक्याला लागला. यात ते जखमी झाले. दहिवलकर यांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी संतोष पुंडलिक तुराणकर (40) राहाणार सावर्ला याच्याविरोधात भादंविच्या कलम 324 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

One Day Ad

हे देखील वाचा:

50 एकरची सोलर झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!