परिक्षेविनाच संधी मिळाल्याने ‘ढ’ विद्यार्थी खुश

लॉकडाऊन मुळे कुठल्याही शाळेत महाराष्ट्र दिनी कार्यक्रम नाही

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: बौध्दीक क्षमतेला तोलण्यासाठी परीक्षेशिवाय दुसरे कोणतेच माध्यम सध्यातरी अस्तित्वात नाही. अभ्यासकांच्या बुद्धीमत्तेचे परीक्षण हे ठरलेल्या वेळापत्रकानुसार केले जाते. मात्र कोरोणा संकटाच्या परिक्षेत पास होण्यासाठी शालांत परीक्षाच रद्द करावी लागली आहे त्यामुळे परिक्षेविना पुढील सत्रासाठी संधी मिळाल्याने सर्व “ढ ” विद्यार्थी खुश झाले आहेत.

माध्यमिक शालांत परीक्षा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जात होत्या व या परीक्षेचा निकाल दरवर्षी 1 मे या महाराष्ट्र दिनी जाहिर करण्यात येत होता. या निकालातुन विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांचीही क्षमता उघड व्हायची. गुणवत्ते नुसार पालकासह विद्यार्थी पुढिल पर्याय निवडत होते. यंदा या परीक्षेच्या ऐन वेळी कोरोणा या साथ आजाराची भयावह परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शिक्षण विभागाला संपूर्ण परिक्षात रद्द कराव्या लागल्या.

यंदा विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता तपासण्याची संधी हुकली आहे. या प्रकाराने ढ विद्यार्थी चांगलेच खुश झाले असून हुशार आणि ढ विद्यार्थी यंदा पहिल्यांदाच समान पातळीवर आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

तालुक्यात एकुण 23 माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालये अस्तित्वात असुन या मध्ये आदर्श कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, मार्डी, मारेगाव, कर्मविर भाऊराव पाटील विद्यालय चिंचमंडळ, भारत विद्या मंदिर कुंभा, पंचशील विद्यालयात नवरगाव राष्ट्रीय विद्यालय मारेगाव हिवरा (मजरा) ईत्यादी विद्यालयाचा समावेश आहे.

दरवर्षी या विद्यालयातुन शेकडो विद्यार्थी ज्ञानार्जनाचे धडे गिरवत असताना शालांत परीक्षेत अधीकाधिक गुण मिळावे यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. मात्र वर्षभरात केलेल्या प्रयत्नांचे फलीत तपासण्याची संधी त्यांना शालांत परीक्षेत मीळत असतांना यंदा ऐन परीक्षेच्या काळात लाकडाऊन झाल्यामुळे गुणवत्ता श्रेणी तपासण्याची संधी यावेळी हुकली आहे. त्यामुळे ढ विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी या मध्ये प्रथमच समानता पहायला मिळाली आहे.

दरवर्षी नापास, वरपास, पास अशा विद्यार्थ्यांच्या श्रेणी मध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसुन येत होती. वर्गातील ढ विद्यार्थ्यांचा आकडा कमालीचा वाढला असताना प्राप्त गुणवत्तेच्या आधारावर पालकासह विद्यार्थ्यांना पुढील निर्णयासाठी सोयीचे जात होते. यंदा कोरोणाच्या संकटाचा फटका या परीक्षार्थीना बसला असून योग्य निर्णय घेण्यास त्यांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला असला तरी ढ विद्यार्थ्याना परिक्षेविना संधी मिळाल्याने ते खुश आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.