रंगारीपुरा येथील तरुणाने घेतला गळफास

काही वर्षांआधी आई वडिलांचे छत्र हरवले...

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गणेशपूर रोडवरील रंगारी पुरा येथे राहणाऱ्या एका तरुणाने मंगळवार 21 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मयूर संजय खापे (26) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. तो शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करीत होता. त्याचे आई वडिलांचे छत्र आधीच हरवले होते. घऱी तो व त्याचा मोठा भाऊ असे दोघेच राहायचे. मोठा भाऊ हा एका हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. मंगळवार त्याचा मोठा भाऊ हा कामासाठी गेला होता. दरम्यान दुपारी मयूर घऱी एकटाच होता. त्याने घराच्या लाकडी फाट्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. मयूरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

तब्बल 6 म्हशींना रेल्वेने चिरडले, गणेशपूर जवळील घटना

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.