जितेंद्र कोठारी, वणी: दारूच्या नशेत विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत गोवारी (पार्डी) गावातील सदर घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शंकर हुसेन किनाके (30) रा.गोवारी (पार्डी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक शंकर किनाके आपल्या पत्नीसह मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत होता. शंकरला दारुच्या व्यसनामुळे पती पत्नीचे नेहमी भांडण व्हायचे. रविवार 17 एप्रिल रोजी पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण होऊन त्याची पत्नी घर सोडून निघून गेली. पत्नी घर सोडून गेल्यामुळे व्यथित शंकर किनाके यांनी भावाला फोन करून आत्महत्या करतो अशी धमकी दिली. पण दारू पिऊन नेहमी धमक्या देत असल्यामुळे त्याच्या भावानेसुद्दा शंकरच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही.
मात्र सोमवारी पहाटेच्या दरम्यान शंकर यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. आत्महत्येच्या घटनेबाबत शिरपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतकाच्या प्रेताची वणी ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी करुन शव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास सपोनि गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.