विविध पुरस्कार प्राप्त रिंकू राजगुरु अभिनीत आशा सिनेमा वणीत रिलिज
पाहा रोज 7 वा. एक शो सुजाता थिएटरमध्ये, दु. 11, दु. 3 रा. 9 वा. धुरंधर
बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांसाठी या आठवड्यात सामाजिक जाणीव, भावनिक क्षण आणि ग्रामीण जीवनाचा वास्तववादी अनुभव घेऊन आला आहे रिंकू राजगुरुचा बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा ‘आशा’! 61 व्या राज्य शासनाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘आशा’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला असून रिंकू राजगुरुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान प्राप्त झाला आहे. ग्रामीण जीवनातील आशा स्वयंसेविकांची आजवर कधीच न पाहिलेली कहाणी या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सुजाता थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रदर्शित होत असून आशा स्वयंसेविकांच्या जीवनावर आधारित हृदयस्पर्शी कथेमुळे ‘आशा’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुजाता थिएटरमध्ये रोज संध्याकाळी 7 वा. ‘आशा’चा शो प्रेक्षकांसाठी पाहता येणार आहे. तर दु. 11 वा., दु. 3 वा. आणि रात्री 9 वा. ‘धुरंधर’ या सिनेमाचे शो आहेत.
वीकेंडला विशेष गर्दीची शक्यता वर्तवली जात आहे. थिएटरचे आधुनिक साउंड सिस्टिम, आरामदायी बसण्याची व्यवस्था आणि लक्झरीअस वातावरणामुळे प्रेक्षकांना अधिक रोमांचक सिनेमाचा अनुभव मिळणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.
काय आहे सिनेमाची स्टोरी/थिम
‘आशा’ हा चित्रपट महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी सांगतो. दिपक पाटील दिग्दर्शित या सिनेमात मालती नावाच्या आशा वर्करची ओळख होते. गरोदरपणातील महिलांची काळजी घेणं, मासिक पाळीबद्दल जागरुकता निर्माण करणं अशी महत्वाची कामं ती करताना दिसते. सासूच्या विरोधाला न जुमानता मालती गावोगावी फिरते आणि एका गरोदर महिलेच्या जीवनाशी निगडित जळजळीत वास्तव समोर आणते. पुढे मालती त्या महिलेला कशी मदत करते, याची कहाणी ‘आशा’ सिनेमात दिसते.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

Comments are closed.