पुष्पाच्या धुवाधार यशानंतर सुपरस्टार रवी तेजाचा खिलाडी झालाये रिलिज

ऍक्शन आणि कॉमेडीचा जोरदार तडका, बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

बहुगुणी डेस्क, वणी: ब-याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला तेलुगू चित्रपट सृष्टीचा सुपरस्टार रवी तेजाचा बहुचर्चित चित्रपट खिलाडी आज रिलिज झाला आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात या चित्रपटाचा वणीकरांना आनंद घेता येणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये ऍक्शन आणि कॉमेडीची मेजवानी मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये रवी त्याच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत आहे. हा सिनेमा एकाच वेळी तेलुगू आणि हिंदीमध्ये रिलिज झाला आहे. सुजाता थिएटरमध्ये आपल्याला हिंदी भाषेत हा सिनेमा बघता येणार आहे. 

रवी तेजासह चित्रपटात डिंपल हयाती आणि मीनाक्षी चौधरी या दोन अभिनेत्रींवर रोमान्स करताना दिसणार आहे. त्याचे अॅक्शन सीन्सचीही सध्या चांगलीच चर्चा होत आहे. चित्रपटाची स्टोरी एका मनी माइंडेड व्यक्तीची आहे. यामध्ये कन्नड चित्रपट अभिनेता अर्जुन सर्जा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर अनसूया भारद्वाज लोकांना हसवताना दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश वर्मा यांनी केले असून चित्रपटाचे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे. देवी श्री प्रसाद यांनी दिलेल्या पुष्पा चित्रपटाचे संगीत सध्या चांगलेच गाजत आहे. रवी तेजाचा मागील चित्रपट ‘क्रॅक’ 9 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तो चित्रपट देखील हिट ठरला. रवीच्या क्रॅक चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.