कोळसा तस्करांवर धाडसी कारवाई, दोन ट्रक व 41 टन कोळसा जप्त

ट्रक चालकाचा सुरक्षा रक्षकाच्या अंगावर ट्रक नेण्याचा प्रयत्न, 10 आरोपी अटकेत

विवेक तोटेवार, वणी: कोळसा चोरी करून पळणाऱ्यांवर वेकोलि सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल व वणी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. सदर कारवाई 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत दोन ट्रक व कोळसा असा एकूण 26 लाख 25 हजार 335 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास महाराष्ट्र सुरक्षा बल व वेकोलि सुरक्षा गार्ड ला माहिती मिळाली की काही चोरटे उकणी खदाणीतून ट्रकमध्ये कोळशाची चोरी करीत आहे. माहिती वरून महाराष्ट्र सुरक्षा बलचे 8 जवान पिंपळगाव भालर मार्गावर सापळा लावून बसले. दरम्यान ट्रक क्रमांक MH49 AT9192 व MH 40 AK5201 हे त्यांना येताना दिसले.

ट्रक चालकाचा अंगावर ट्रक नेण्याचा प्रयत्न
सुरक्षा रक्षकांनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक त्यांच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला. जवान थोडक्यात बचावले व त्यांनी दोन्ही ट्रक व ट्रकमधील चालकांसह तिघांना घटनास्थळावरुन ताब्यात घेतले. त्यांनी तातडीने या प्रकरणाची वणी पोलिसांना माहिती दिली. वणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व ट्रक व तीन आरोपींना ताब्यात घेतले.

सदर परिसर हा शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत येत असल्याने शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवार सुद्धा या ठिकाणी आले. या कारवाईत ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी केल्यानंतर 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 10 आरोपींना वणी पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपींमध्ये अश्फाक, नागेश रामन्ना चित्तलवार रा. महादेवनगर चिखलगाव, रोहन वरारकर, अरविंद विजय भोयर (मोहदा), धीरज रामकृष्ण मडकाम (डोर्ली), हर्षल रमेश लोहबळे, स्वप्नील पांडुरंग नागपुरे, जितेंद्र सिंग उर्फ कालू संजय सिंग (भालर), धनराज मंगल येसेकर रा. गणेशपूर, राजू केसेकर रा. राजूर कॉलरी या 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ते तीन जण अज्ञात आहेत. सिक्युरिटी गार्ड इंचार्ज शिवराम डवरे यांच्या तक्रारीवरून एकूण 13 आरोपींवर भादंविच्या कलम 307, 395, 353 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत 41 टन कोळसा किंमत 1 लाख 10 हजार 605 रुपये व दोन ट्रक किंमत 24 लाख असा एकूण 25 लाख 10 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

सदर कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार, पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माया चाटसे, पोउपनी प्रवीण हिरे, संतोष आढव, विशाल गेडाम, शंकर चौधरी, निरंजन खिरटकर, शुभम सोनूले, विजय राठोड, चालक सुरेश किनाके यांनी पार पाडली.

हे देखील वाचा:

पुष्पाच्या धुवाधार यशानंतर सुपरस्टार रवी तेजाचा खिलाडी झालाये रिलिज

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई

Comments are closed.