रविवारी वणीमध्ये पहिल्यांदाच मोफत सुपरस्पेशालिटी आरोग्य शिबिर

सुप्रसिद्ध न्यू ईरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ करणार तपासणी

0

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये रविवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी मोफत सुपरस्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक लोढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुपारी 11 ते 3 दरम्यान हे शिबिर होणार आहे. नागपूर येथील न्यू ईरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर विशेष आजारांच्या रुग्णांची तपासणी करणार आहे. डॉ. महेंद्र लोढा यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.

अनेक दुर्धर आजाराचे निदाण आणि उपचार करण्यासाठी रुग्णांना नागपूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गाठावे लागते. याचा खर्च ही मोठा असतो. अनेक गरीब रुग्णांना तो झेपणारा नसतो. त्यामुळे वणीत पहिल्यांदाच सुपर स्पेशालिटी सेवांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मेंदूरोग, हृदयरोग, मानसिक आजार, गुप्तरोग, त्वचारोग, किडणी रोग इत्यादी आजारांवर नागपूर येथील विख्यात तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहे.

शिबिरात मेंदूरोग सर्जरीसाठी डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. गौरव आमले, हृदयरोग सर्जरीसाठी डॉ. आनंद संचेती, हृदयरोग निदानासाठी डॉ. निधेश मिश्रा, मेंदूरोग साठी डॉ. पराग मून, नेत्ररोग डॉ. सौरभ मुंधडा, डॉ. सौरभ अग्रवाल, मानसिक रोग डॉ. श्रेयस मांगिया, दंतरोग डॉ. कविता देशमुख, पोटविकार डॉ. विजेंद्र किरनाके, बालरोग डॉ. स्वप्निल भिसीकर, डॉ. अभिजीत चौधरी, मुत्ररोग डॉ. शब्बीर राजा, मधुमेह डॉ. अमोल कोकास, प्लास्टिक सर्जरी डॉ. अनुप सारडा, किडनी रोग डॉ. अमित पासारी, अस्थिरोगसाठी डॉ. उत्सव अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नागपूर येथील न्यू ईरा हॉस्पिटल हे केवळ विदर्भातच नव्हे तर मध्य भारतातील एक सुप्रसिद्ध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. हृदय प्रत्यारोपण किंवा किडनी प्रत्यारोपण सारख्या जटील शस्त्रक्रिया करणारे हे मध्य भारतातील पहिले व एकमेव हॉस्पिटल आहे. या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहे ही वणी परिसरासाठी एक आनंदाची बाब आहे. अशी माहिती डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली.

वणीत पहिल्यांदाच सुपर स्पेशालिटी आरोग्य शिबिर होणार असल्याने रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. तसेच पूर्व तपासणी झाली असल्यास रुग्णांनी त्याच्या फाईल व रिपोर्टसह सहभागी व्हावे असे आवाहन लोढा व सुगम हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.