भाविकांना सुरदेवीचे दर्शन झाले अधिक सोपे

डॉ. लोढांच्या नेतृत्वात तयार झालेल्या पायऱ्यांचे लोकार्पण

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदेवी हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान. डोंगरावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी अवघड अशी वाट होती. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे ही वाट अधिकच बिकट झाली होती. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या लक्षात आली. काही भाविकांनी अत्यंत विश्वासाने ही बाब त्यांना सांगितलेही. यावर त्वरीत काम करायला डॉ. लोढा यांच्या पुढाकारात सुरुवात झाली.

नव्याने तयार केलेल्या पायऱ्या

नऊ दिवसांत हे काम पूर्ण झालं पाहिजे हे ध्येय डॉ. लोढा यांनी ठेवले. आणि खरोखरच अवघ्या नऊ दिवसांत भाविकांच्या सोयीसाठी पायऱ्या तयार झाल्यात. या पायऱ्यांचं शुक्रवारी डॉ. लोढा यांच्या हस्ते लोकार्पण झालं.

सुरदेवी हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे स्थान अनेकांना आकर्षित करतं. मात्र येथे सुविधांचा अभाव आहे.

पायऱ्यांचं लोकार्पण करताना डॉ. लोढा व अन्य

धार्मिक उपक्रम, पर्यटन आणि सहलीसाठी अनेकजण इथे जाणे पसंत करतात. मात्र इथल्या गैरसोयींमुळे या स्थळाला पाहिजे तशी वर्दळ नसायची. श्रद्धा, निसर्ग आणि पर्यटन यांचा सुंदर मिलाफ असलेलं हे स्थळ आहे. आदिवासीबहूल परिसरात आहे. डॉ. लोढा हे आदिवासींसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करीत आहेत.

हा परिसर जर श्रद्धास्थळासोबतच पर्यटनस्थळ झाल्यास, स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी डॉ. लोढा यांनी इथल्या प्राथमिक बाबींवर पहिल्यांदा काम सुरू केले.

त्यातील अत्यंत महत्त्वाची बाब होती, मंदिराच्या पायऱ्या. या पायऱ्या पूर्ण होताच भाविक व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळाळी आली. टाळ, मृदुंगाच्या गजरात हा सोहळा झाला. बाळापहूर, बोपापूर, खडकडोह, चिचघाट, पुलकी वाढोणा, दरा, साखरा या पंचक्रोशीतील नागरिकांनी लोकापर्णाच्या दिवशी डॉ. लोढा यांचा हृद्य सत्कार केला. त्यांचं औक्षवण केलं. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

याच त्या पायऱ्या

नवरात्राचे औचित्य बघता घटस्थापनेच्या दिवशी पायऱ्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. तर नवरात्राच्या समारोपाला त्यांचं लोकार्पण झालं.

या निमित्त दहिहांडी, काला, भजन असे अनेकविध कार्यक्रम झालेत. या सोहळ्यात गावाचे सरपंच विलास नैताम, संस्थानाचे प्रमुख सुनील मत्ते, नागेश ठावरी यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. ह. भ. प. कुमरे महाराज यांच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, प्रभाकर मानकर, संजय जंबे, महेश पिदूरकर, संदिप धवणे, अंकुश नेहारे, स्वप्निल धुर्वे, सिराज सिद्धिकी, मोहाडे, संदिप धवणे, सोनू निमसटकर, राजू उपरकर यांच्यासह राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, मंदिराचे विश्वस्त, गावकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.