बहुगुणी डेस्क, वणी: श्रीकृष्ण भवन समोरील सुरेश शुक्ल (78) यांचे 2 जुलैच्या रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर स्थानिक मोक्षधाम येथे सकाळी 11:30 वाजता अंतिम संस्कार होतील. येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी शिक्षकेतर कर्मचारी म्हणून प्रदीर्घकाळ सेवा दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मुलगी जावई सून नातवंडे असा बराच आप्त परिवार आहे. अत्यंत मनमिळावू आणि सुशोभावी म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. त्यांच्या कस्मात जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.