सलग दुस-या दिवशी हॅटट्रीक… आशुतोषची हॅटट्रीक… रंगतदार सामन्यात जन्नतचा विजय

वेगवान अर्धशतक मारणा-या रशनीशची आज बॉलिंगने कमाल.. एका ओव्हरमध्ये घेतल्या 4 विकेट्स....

विवेक तोटेवार, वणी: सोमवार हा दिवस तुर्नामेंटसाठी काहीसा त्रासदायक ठरला. पावसाने व्यत्यय आणण्याले सामने उशिरा सुरू झाले व प्रत्येक सामना हा 6 षटकांचा खेळला गेला. मात्र त्यातही प्लेअर्सने आपली कमाल दाखवली. खास करून आजचा दिवस बॉलर्सने गाजवला. राजपूत संघाचा आशितोष डवरे याने आज हॅटट्रीक घेतली. ही लीगमधली दुसरी हॅटट्रीक ठरली. तर रविवारच्या सामन्यात अवघ्या 15 बॉल्समध्ये अर्धशतक ठोकणा-या रजनीश पांडेने आज बॅटिंगसह बॉलिंगमध्येही कमाल दाखवली. त्याने बॅटिंग करताना 17 चेंडूत 3 षटकार हाणत नाबाद 31 धावा केल्या. तर एका ओव्हरमध्ये 4 विकेट्स ही घेतल्या. पावसामुळे सामना रात्री उशिरापर्यंत सुरू झाले होते. मात्र प्रेक्षकांचा उत्साह रात्री उशिरापर्यंत कायम होता. पारसमल प्रेमराज ज्वेलर्सतर्फे या चॅम्पियन लीगचे आयोजन करण्यात आले आहे. 

पहिला सामना हा माऊली मराठा विरुद्ध श्रीराम वॉरीअर्स यांच्यात खेळला गेला. माऊली संघाने प्रथम फलंदाजी करीत 4 गडी बाद 47 धावा काढल्या. माऊली संघाकडून संतोष ताजने याने 1 षटकात 3 चौकाराच्या मदतीने नाबाद 24 धावा केल्या. धावसंख्या लक्षात घेता श्रीराम संघ 48 धावांचे टारगेट सहज पूर्ण करणार असे वाटत होते. मात्र धावांचा पाठलाग करताना श्रीराम संघाची सुरवात खराब झाली. पहिल्याच षटकात 7 धावांवर त्यांचे 2 गडी बाद झाले. मागील सामन्याचा हिरो शुभम मदान हा ही संघाला तारू शकला नाही. माऊली संघाकडून अतिशय सुरेख गोलंदाजी झाली. निखिल तेलंग, लखन चौधरी, प्रतीक मत्ते, लखन आत्राम यांच्या उत्तम गोलंदाजीचा जोरावर माऊली संघाने श्रीराम संघाला 34 धावावर रोखले. हा सामना माऊली मराठा संघाने 14 धावांनी जिंकला. सामन्याचा सामनावीर प्रतीक मत्ते याला ठरविण्यात आले. त्याने आपल्या दोन षटकात 10 धावा देत 2 गडी टिपले.

दुसरा सामना हा एम ब्लास्टर विरुद्ध 11 टायगर रोअरिंग यांच्यात खेळला गेला. एम ब्लास्टर संघाने प्रथम फलंदाजी करीत कर्णधार शोएब खान व संतोष पारखी यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर 5 बाद 64 धावा केल्या. परंतु धावांचा पाठलाग करताना 11 टायगर संघ हा 6 बाद 31 धावाच करू शकला. एकतर्फी झालेला हा सामना एम ब्लास्टर संघाने अगदी सहजपणे 33 धावांनी जिंकला. या सामन्याचा सामनावीर खालिद हुसेन ठरला. त्याने 2 षटकात 12 धावा देत 3 गडी बाद केले.

आशुतोष डवरेची हॅटट्रीक
तिसरा सामना हा रेनबो विरुद्ध राजपूत रॉयल्स यांच्यात खेळला गेला. रेनबो संघाने प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात स्पर्धेतील दुसरी हायट्रिक राजपूत संघाचा मध्यमगती गोलंदाज आशितोष डवरे याने घेतली. त्याने ओव्हरच्या पहिल्या तीन चेंडूत सलग तीन विकेट्स चटकावल्या. तर याच ओव्हरमध्ये 2 गडी धावबादही झाले. रेनबो संघाला अवघ्या 8 गडी बाद 35 धावांपर्यत मजल मारता आली. रेनबो संघाकडून सारंग माथनकर याने सर्वधिक 14 धावा केल्या. 36 धावांचा पाठलाग करताना राजपूत संघाने 2 गडी गमावून 3.3 षटकातच हे लक्ष्य गाठले. या सामन्याचा सामनावीर आशितोष ठरला. त्याने 1 षटकात 3 गडी बाद केले.

आशुतोषची धमाकेदार बॉलिंग

चौथा सामना हा आमेर नाईट रायडर विरुद्ध जय महाकाली संघ यांच्यात खेळला गेला. आमेर संघाने प्रथम फलंदाजी करीत 4 गडी बाद 43 धावा केल्या. आमेर संघाकडून कर्णधार रवी राजूरकर याने सर्वधिक 16 धावा केल्या. जय महाकाली संघ हे लक्ष सहतेने पूर्ण करेल असे वाटत होते. परंतु आमेर संघाकडून उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन झाले व जय महाकाली संघाला 6 बाद 25 धावापर्यत मजल मारता आली. हा सामना आमेर संघाने सहजतेने 18 धावांनी जिंकला. या सामन्याचा सामनावीर संदीप खिरटकर ठरला. त्याने 1 षटकात 1 धाव देत 2 गडी बाद केले.

अंतिम सामना रंगला..
पाचवा व अंतिम सामना हा छत्रपती वॉरीअर्स विरुद्ध जन्नत 11 यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करीत छत्रपती संघाने 5 गडी बाद 48 धावा केल्या. छत्रपती संघाच्या रजनीश पांडेची आजही बॅट तळपली. आधीच्या मॅचमध्ये वेगवान अर्धशतक करणा-या रजनीशने आजच्या सामन्यात 17 चेंडूत 3 षटकार हाणत नाबाद 31 धावा केल्या. 49 रन्सचा पाठलाग करताना जन्नत संघ आधीपासूनच वरचढ ठरला. 4ओव्हरमध्ये जन्नत संघाची धावसंख्या ही 4 बाद 43 होती. 12 चेंडूत आता जन्नत संघाला जिकण्यासाठी 7 धावा हव्या होत्या. मात्र पाचव्या ओव्हरने मॅचचे पारडेच बदलवले. आपल्या बॅटिंगची कमला दाखवणारा रजनीश पांडे याने 5 वा ओव्हर टाकला. रजनीशने या षटकात 1 धाव देत तब्बल 4 गडी बाद केले. त्यामुळे मॅच थरारक वळवणावर आली.

शेवटच्या ओव्हरचा थरार
जन्नत संघाला एका ओव्हरमध्ये 6 धावांची गरज होती. तर त्यांच्या केवळ 2 विकेट शिल्लक होत्या. शेवटचा ओव्हर सचिन वानखेडेने टाकला. त्याच्या पहिल्या दोन चेंडूत 4 धावा काढण्यात आल्या. आता 3 चेंडूत 1 धाव हवी होती. मात्र त्याच वेळी जन्नत संघाचा 9 वा गडी बाद झाला. आता 2 चेंडूत 1 धाव हवी होती व विकेटही एकच बाकी होती. त्यामुळे पुन्हा एकदा सुपर ओव्हर होते की काय असे वाटत होते. परंतु पाचव्या चेंडूवर एक धाव काढण्यात आली व जन्नत संघ विजयी झाला. या सामन्याचा सामनावीर सैफुर रहेमान याला ठरविण्यात आले. त्याने 2 षटकात 14 धावा देत 3 गडी बाद केले.

बॉलिंग करताना रजनीश पांडे

पुन्हा गेला छत्रपती वॉरिअर्सच्या तोंडचा घास
रविवारी छत्रपती वॉरिअर्सने संघाने 10 षटकात 128 धावांचा डोंगर रचला होता. मात्र एवढा मोठा स्कोअर करूनही छत्रपती वॉरिअर्सला जिंकता आले नाही. दुस-या दिवशीही मॅच रंगतदार अवस्थेत आली. मात्र ही मॅच देखील छ. वॉरिअर्सच्या हातून गेली. अद्याप छ. वॉरिअर्स संघाला एकही मॅचमध्ये विजय मिळवता आला नाही. गुणतालिकेत सध्या आमेर नाईट रायडर 7 गुण घेऊन पहिल्या क्रमांकावर आहे. राजपूत, रेनबो, माऊली व श्रीराम संघ हे समान 6 गुण घेऊन दुस-या क्रमांकावर आहे.

अंकतालिका
1) आमेर नाईट रायडर -7
2) राजपूत रॉयल्स -6
3) रेनबो क्रिकेट क्लब – 6
4) माऊली मराठा -6
5) श्री राम वारीअर्स – 6
6) जन्नत 11 – 5
7) एम ब्लास्टर – 5
8) जय महाकाली – 5
9) टायगर रोअरिंग – 4
10) छत्रपती वारीअर्स – 0

पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार….

Comments are closed.