29 डिसेंबरला T-10 चॅम्पियन लीगचा उद्घाटन सोहळा, गौतमी पाटील प्रमुख आकर्षण

वणीकरांनो मनोरंजन आणि थरार अनुभवण्यासाठी सज्ज राहा... 2 डिसेंबरपासून रंगणार सामने

निकेश जिलठे, वणी: वणीकरांनो मनोरंजन आणि थरार अनुभवण्यासाठी सज्ज राहा. गेल्या वर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर यावर्षी आणखी दणक्यात टी 10 चॅम्पिअन्स लीग 2024 होणार आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून 29 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता शासकीय मैदान, पाण्याच्या टाकीजवळ या लीगचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण महाराष्ट्राची सुप्रसिद्ध व ट्रेंडिंग नृत्यागंणा गौतमी पाटील राहणार आहे. तर 2 जानेवारी 2024 पासून लीगला सुरूवात होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन चॅम्पियन लीग कार्यकारिणीचे अध्यक्ष ऍड कुणाल चोरडिया यांनी केली आहे.

T-10 ही चॅम्पियन लीग स्पर्धा ही वणीच्याच नाही तर जिल्ह्यातील क्रीडा विश्वाच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. यात 10 टीम सहभागी असणार आहे. टीममध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील धडाकेबाज खेळाडूंचा सहभाग असणार आहे. संपूर्ण सामने हे दिवस व रात्रकालीन राहणार आहे.  प्रत्येक दिवशी प्रत्येक टीमची मॅच होणार असून एका दिवशी 5 सामने खेळले जाणार आहे. प्रत्येक मॅच ही 10 ओव्हरची राहणार आहे.

स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक हे 11 लाख 1 हजार 1 रुपये, दुसरे बक्षिस 5 लाख 1 हजार 1 रुपये, तिसरे बक्षिस 2 लाख 51 हजार 1 रुपये तर चौथे बक्षिस 1 लाख 1 हजार 1 रुपये आहे. तर मॅन ऑफ दी सिरिज हे यामहाची आर 15 ही बाईक आहे. याशिवाय अनेक वैयक्तिक बक्षिसांची लयलूट या स्पर्धेत राहणार आहे.

संपूर्ण तुर्नामेंट हे आयपीएलच्या नियमानुसार खेळले जाणार आहे. मॅचमध्ये सर्टीफाईड पंच अंपायर म्हणून राहणार आहे. प्रेक्षकांना आनंद घेता यावा यासाठी मैदानावर भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. तर सामन्याची कमेंट्री प्रोफेशन कमेंट्री करणारे करणार आहेत. विशेष म्हणजे महिला प्रेक्षकांसाठी सामन्यांच्या आनंद घेण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. 

ऐतिहासिक लीगचे साक्षीदार व्हा – ऍड कुणाल चोरडिया
गेल्या वर्षी वणीकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने या वर्षी आणखी दणक्यात ही स्पर्धा होणार आहे. वणीच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेत्या टीमला 10 लाखांपेक्षा अधिकचे बक्षिस दिले जात आहे. याशिवाय इतरही अनेक आकर्षक बक्षिसांची लयलूट या स्पर्धेत राहणार आहे. तसेच उद्घाटन सोहळ्यासाठी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम होणार असून यवतमाळ जिल्ह्यात पहिल्यांदाच त्यांचा कार्यक्रम होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला व टी 10 चॅम्पियन्स लीगला मोठ्या संख्येने हजेरी लावून या ऐतिहासिक लीगचे साक्षीदार व्हावे, अशी आग्रहाची विनंती.
– ऍड कुणाल चोरडिया, अध्यक्ष

या संपूर्ण सोहळ्यासाठी उपाध्यक्ष मनिष गायकवाड, सचिव उमेश पोद्दार, सहसचिव संदीप बेसरकर, प्रचारक पीयूष चव्हाण, सह प्रचारक राजू रिंगोले यांच्यासह सदस्य मयूर घाटोळे, शुभम मदान, कीट मॅनेजर तौसीफ खान, क्युरेटर नंदकिशोर रासेकर, सल्लागार संघदीप भगत यांच्या मार्गदर्शनात तयारी सुरू आहे.

Comments are closed.