भर चौकातून तलाठ्याची दुचाकी चोरट्याने केली लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: भर बाजारात ठेवलेली मोटारसायकल एका चोरट्यांनी लंपास केली. रविवारी दिनांक 26 रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दुचाकी मालकाचे 25 हजारांचे नुकसान झाले आहे. भर बाजारात व तेही रविवार सारख्या बाजाराच्या दिवशी ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सुमेध भीमराव अघम (45) हे छोरीया ले आऊट मधील रहिवासी असून ते तलाठी म्हणून गणेशपूर येथे नोकरी करतात. त्यांच्याकडे होन्डा शाईन ही दुचाकी (MH29AX 7656) आहे. रविवारी दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास गांधी चौक येथे फुलांचे हार घेण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी रोडच्या एका बाजूला गाडी लावली व ते दुकानात गेले.

दरम्यान एक पांढरा रंगाचा शर्ट व शेंद्री रंगाचा दुपट्टा बांधलेला एक अज्ञात इसम आला. तो सुमेध यांना धक्का मारून त्यांच्या दुचाकीजवळ गेला व मोटार सायकल बळजबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सुमेध यांनी त्या दुचाकी चोरट्याचा पाठलाग केला. मात्र चोरटा गाडी घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान कार्यालयात मिटिंग असल्याने ते कार्यालयात गेले. अखेर दुस-या दिवशी त्यांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.

या चोरीत सुमेध यांचे 25 हजारांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 392 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.