अनिकेतने अशी केली कमाल, पूर्ण तालुका गाजवला

तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्यात आला प्रथम

विवेक तोटेवार, वणी: प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विशेष कला गुण असतात. पंचायत समिती वणीद्वारा नुकताच तालुकास्तरीय विज्ञान मेळावा झाला‌. या स्पर्धेत लायन्स हायस्कूलचा अनिकेत खिरटकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याच्या या यशाचे सर्वस्तरांतून कौतुक केले जात आहे

Podar School 2025

वणी पंचायत समितीद्वारे 16 जुलै रोजी तालुकास्तरावर विज्ञान मेळावा घेण्यात आला होता. या विज्ञान मेळाव्यात तालुक्यातील विविध शाळेतील 13 विद्यार्थ्यांनि सहभाग घेतला. या स्पर्धेत कुत्रीम बुद्धिमत्ता व संभाव्यवता या विषयवर आपले विचार व्यक्त केले. अनिकेत याचा या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, राजा पाथ्रटकर, प्राचार्य चित्रा देशपांडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत गोडे व शिक्षक कौतुक करीत आहेत. अनिकेत आपल्या यशाचे श्रेय आई वडील, प्राचार्य चित्रा देशपांडे, शिक्षिका सोनाली काळे, शिक्षिका मोनिका इसनकर यांना देतो.

Comments are closed.