तान्हा पोळा: सायकल, ट्रायसिकल व लकी ड्रॉने गाजणार वणीचे शासकीय मैदान

आज भव्य तान्हा पोळा, प्रत्येक चिमुकल्याने सहभागी व्हा, ऍड कुणाल चोरडिया यांचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तान्हा पोळ्यानिमित्त शासकीय मैदान येथे भव्य तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी सं. 4.30 वाजता या उत्सव सुरु होणार आहे. या निमित्त चिमुकल्यांसाठी लाकडी बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत बक्षिसांची लयलूट राहणार आहे. विशेष म्हणजे 21 सायकल यासह विविध आकर्षक बक्षीसं हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण आहे. सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड कुणाल विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

या स्पर्धेत गट अ- वय 1 ते 3 – 3 Tricycle, गट ब- वय 3 ते 6 – 5 सायकल, गट क- 6 ते 9 – 5 सायकल, गट ङ- वय 9 ते 12 – – 5 सायकल, तर 3 सायकलींचे लक्की ड्रॉ होणार असून सर्व सहभागी स्पर्धकांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण माजी केंद्रीय मंत्री व ओबिसी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या विशेष उपस्थिती मध्ये होणार आहे.

प्रत्येक चिमुकल्याने सहभागी व्हा – ऍड कुणाल चोरडिया
“तान्हा पोळा हा शेतकऱ्यांचा संस्कृतीशी जोडलेला सण आहे. या परंपरेला लहान मुलांपर्यंत पोहोचवून त्यांच्यात संस्कृतीविषयी प्रेम निर्माण करणे, हे या स्पर्धेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आकर्षक बक्षिसांसह प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहन मिळावे यासाठी खास व्यवस्था केली आहे. जास्तीत जास्त चिमुकल्यांनी या उत्सवात सहभागी व्हावे, हीच अपेक्षा आहे.” – ऍड. कुणाल विजय चोरडिया, संयोजक 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या स्पर्धेत एकूण सहाशे प्रवेश मर्यादा असून नोंदणी कार्यक्रम स्थळी करता येणार आहे. नोंदणी करिता सागर मुने 9028903511, राजु रिंगोले 9284881655, सौरभ राजुरकर 9657698332 यांच्याशी संपर्क साधावा. विशेष म्हणजे ही स्पर्धा निःशुल्क आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे, आवाहन कार्यक्रमाचे संयोजक अ‍ॅड. कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे.

Comments are closed.