समीर रंगरेजच्या मालकीचे 2 ट्रक चोरट्यांनी चोरले

घटना सीसीटीव्हीत कैद, चारचाकी वाहनात आलेल्या 4 चोरट्यांचा प्रताप

जितेंद्र कोठारी, वणी: एका चारचाकी वाहनामध्ये आलेल्या चोरट्यांनी रस्त्यावर उभे असलेले दोन हायवा ट्रक चोरून नेले. सदर घटना शुक्रवार 27 ऑक्टो. रोजी उघडकीस आली. फिर्यादी तस्लीमा समीर रंगरेज (३२) रा. एकता नगर वणी हिने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्द गुन्हा नोंद केला आहे. शहरात दुचाकी चोरी, घरफोडी, दुकानात चोरीच्या घटना घडत असताना चोरट्यांनी चक्क हायवा ट्रक चोरून पोलिसांना आव्हानच दिल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार समीर रफिक रंगरेज रा. एकतानगर वणी यांच्या मालकीचे टाटा कंपनीचे हायवा ट्रक क्रमांक MH34 BG 9452 व MH34 BG 1212 आहे. दोन्ही ट्रक वणी वरोरा मार्गावर लॉर्डस बार समोर समीर रंगरेज यांच्या ऑफिस जवळ उभे होते. शुक्रवार 27 ऑक्टो. रोजी दोन्ही हायवा ट्रक उभ्या केलेल्या ठिकाणी आढळून आले नाही. तेव्हा समीर रंगरेजच्या पत्नी तस्लीम हिने आपल्या मोबाईलवर सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता फुटेजमध्ये पहाटे 4.35 वाजता दरम्यान चारचाकी वाहनामध्ये आलेल्या चौघानी ट्रक घेऊन जात असताना दिसले.

फिर्यादी तस्लीम समीर रंगरेज हिने त्यांचे पती समीर रंगरेज यांच्या नावावर हे ट्रक आहे. समीर रंगरेज सध्या एका प्रकरणात अटकेत आहे. या दोन हायवा ट्रक किमत 28 लाख रुपये आहे. कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी हे ट्रक चोरून नेल्याची तक्रार 27 ऑक्टो. रोजी रात्री 9 वाजता वणी पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांची ओळख पटविण्याच्या प्रयत्नात आहे.

हे देखील वाचा: 

धर्माधिष्ठित राष्ट्राची संकल्पना ही फोल आणि विघातक: ज्ञानेश महाराव

Comments are closed.