गुरुवारी सकाळी वणीत भव्य मॅराथॉन, पोलीस दलाचे आयोजन
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त “रन फॉर युनिटी”
बहुगुणी डेस्क , वणी: देशाच्या एकता आणि अखंडतेचा संदेश देणाऱ्या “रन फॉर युनिटी” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वणीत उद्या 31 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. ही दौड 5 किलोमीटरची असून सकाळी 7 वाजता टिळक चौक वणी येथून मॅराथॉनला सुरुवात होणार आहे. वरोरा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत जाऊन पुन्हा टिळक चौक येथे ही दौड समाप्त होईल.
शहरातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी व शिक्षक, पत्रकार, व्यापारी संघटना, वकील संघ, डॉक्टर असोसिएशन, रोटरी क्लब आणि वणीतील सर्व नागरिकांनी टी-शर्ट, लोअर, ट्रॅक सूट व शूजसह पूर्ण तयारीने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ही मॅरेथॉन केवळ दौड नसून राष्ट्रीय एकतेचा उत्सव आहे. वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशभक्तीचा आणि उत्तम आरोग्याचा संदेश द्यावा. असे आवाहन ठाणेदार गोपाळ उंबरकर यांनी केले आहे. यवतमाळ पोलीस दलाच्या वतीने, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा होत आहे.




Comments are closed.