सुशील ओझा, झरी: वाघाने एका शेतमजुरावर हल्ला केल्याची घडना काल मंगळवारी घडली. यात मजुराची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. पांढरवाणी येथील दादाराव तुकाराम दडांजे वय ४५ वर्ष हे व काही पुरूष व महिला मजूर निमनी दाभाडी येथील जंगलात मजुरीसाठी गेले.
हे सर्व वनविभागाचे रोडवरील दगड बाजुला फेकत होते. दरम्यान रोडच्या बाजुला असलेल्या सिमेन्ट पाईप मध्ये वाघ दडलेला होता.
मजुरांनी फेकलेले दगड वाघास दगड लागले. त्यामुळे चवताळून अचानक वाघाने दादाराववर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्याने सर्वच भांबावून गेले. तिथे असलेल्या सर्व मजुरांनी आरडाओरड केला. त्यामुऴे वाघाने तिथून पळ काढला. या हल्यात मजूर गंभीररीत्या जखमी झाला.
याबाबत वनविभाग व पोलीस विभागांना कळविण्यात आले. वन विभागाचे व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी हजर झाले. त्यांनी जखमीला वनविभागाच्या वाहनात बसऊन प्रथम पांढरकवडा रुग्णालय व नंतर यवतमाळ येथे दाखर केले. या हल्ल्यात पेशंन्टच्या बरगड्या तुटल्या आहेत. सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती मिळाली आहे.