जब्बार चीनी, वणी: गुरुवारी मध्यरात्री उकणी खाण परिसरात एका वाघिणीचे तिच्या 3 बछड्यांसह दर्शन झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. एका डम्पर चालकाला पार्किंग परिसरात हे दर्शन झाले. त्याने याबाबत व्हिडीओ तयार केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. एकाच वेळी 4 वाघांचे दर्शन झाल्याने वकोलि कर्मचारी दहशतीत आले आहे. दरम्यान वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे
वणी पासून काही किलोमीटर अंतरावरच उकणी ही वेकोलिची खाण आहे. या खाणी लगतच कोलार पिंपरी ही खाण आहे. सध्या ही खाण बंद आहे. या खाणीलगत खाणीतून बाहेर निघालेली माती टाकण्यात आली आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात झाडा-झुडुपांची वाढ होऊन तिथे झुडपी जंगल तयार झाले आहे. शिवाय हा भाग निर्जन आहे. त्यामुळे या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाघांचा मुक्त संचार सुरू आहे. याबाबत एक व्हिडीओ नोव्हेंबर तर एक व्हिडीओ डिसेंबर महिन्यात व्हायरल झाला होता. मात्र यावेळी पहिल्यांदाच वाघिणीचा तिच्या 4 बछड्यांसह दर्शन झाले आहे.
गुरुवारी दिनांक 11 फेब्रुवारीच्या मध्यरात्री एक डम्पर चालक पार्किंग परिसरात डम्पर लावण्यासाठी जात होता. दरम्यान पार्किंगजवळ त्याला एका वाघिणीचे दर्शन झाले. त्याने मोबाईल काढून याचे शुटिंग करणे सुरू केले. शुटिंग बंद केल्यानंतर त्याला आणखी एक वाघ दिसला. त्यामुळे त्याने मोबाईलवरून पुन्हा शुटिंग सुरू केले. मात्र वाघिणीच्या मागे एका पाठोपाठ 3 बछडे बाहेर आले. एकाच वेळी चार वाघ दिसल्याची वार्ता मध्यरात्रीच पसरायला सुरू झाली. शुक्रवारी सकाळी हा व्हिडीओ परिसरात चांगलाच व्हायरल झाला.
कामगारांमध्ये पसरली दहशत
खाण परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल वाढले आहे. शिवाय खाणीलगतच जंगल असल्याने अनेक वन्य प्राणी सध्या या परिसरात फिरत असतात त्यामुळे शिकारीसाठी सध्या वाघही याच भागात फिरत असल्याचे दिसत आहे. या परिसरातच उकणी ही खाण सुरू असल्याने तिथे कामगारांची नेहमीच येजा सुरू असते. अनेक कर्मचारी रात्री अपरात्री या खाणीत येतात. वणीहूनही मोठ्या प्रमाणात कर्मचारी या खाणीत जातात. आधी एकच वाघ या परिसरात दिसायचा. मात्र आता एकाचवेळी 4 वाघाचे दर्शन झाल्याने कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली असून ते दहशतीत आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ताबोडा अंधारी अभयारन्य आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर हे अभयारन्य आहे. ताडोबा ते उकणी, मोहुर्ली, विरकुंड, नवरगाव, झरी, पांढरकवडा ते टिपेश्वर अभयारन्य हा वाघांचा कॉरिडोर (भ्रमणमार्ग) मानला जातो. त्यामुळे या भागात सातत्याने वाघांचे दर्शन होत राहते. झरी तालुक्यातील कोडपाखिंडी येथे तर एका वाघाने एका तरुणाची शिकार केली होती. रात्री पासून तब्बल सकाळी 10 वाजेपर्यंत हा वाघ तरुणाचे लचके तोडत शिकार खात होता. या घटनेमुळे केवळ तालक्यातच नाही तर संपूर्ण राज्यभर चांगलीच खळबळ उडाली होती.
लिंकवर घटनेचा व्हिडीओ…
Comments are closed.