किराणा दुकानातील वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्या

श्रीगुरुदेव सेवा मंडळाची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सुपर मार्केट व किराणा दुकानातील वाईन विक्रीचा निर्णय शासनाने त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली. याबाबत शुक्रवारी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

राज्य सरकारने नुकताच सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन विक्रीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. यातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल वाढ होणार आहे. मात्र सरकारने राज्याला व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा. या निर्णयाने व्यसनाला प्रोत्साहन मिळणार असून समाजात गुंडप्रवृत्ती वाढू शकते. त्यामुळे शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी गुरुदेव सेवा मंडळाने केली आहे.

यावेळी उदयपाल महाराज यांच्यासह दिलीप भोयर, मंगल तेलंग, विकास चिडे, गुणवंत पचारे, अभिलाष राजूरकर, अक्षय वैद्य, पुंडलिक मोहितकर, रोशन उपरे, विशाल ठाकरे, सुनील मासीरकर हे उपस्थीत होते.

हे देखील वाचा:

एका वाघानंतर आता तब्बल 4 वाघांच्या दर्शनाने परिसरात दहशत

जंगलात शेळकीची कीटकनाथक प्राशन करून आत्महत्या

Comments are closed.