अर्धवन शिवारात वाघाची दहशत

वाघाच्या दहशतीमुळे कापूस वेचण्यात मिळत नाही मजूर

0
देव येवले, मुकुटबन: झरी तालुक्यातील अर्धवन शिवारात वाघाची दहशत कायम असून, वाघाचा व अन्य वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अर्धवनच्या नागरिकांनी केली आहे. वाघाच्या दहशतीमुळे तसेच अन्य प्राण्यांमुळे शेतमालाचे नुकसान होत आहे, शेतमालाचे नुकसान टाळण्याकरीता सोमवारला अर्धवनच्या नागरिक निवेदन द्यायला गेले. मात्र मुकुटबन येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात संबंधित अधिकारी गैरहजर असल्यामुळे त्यांनी वनरक्षक रोकडे यांना निवेदन दिले.
अर्धवन शिवारात सतत होणाऱ्या वाघाच्या दर्शनाने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. हल्ली कापसाची वेचनीचे दिवस असल्याने मजुरांची आवश्यकता असते. मात्र वाघाच्या दहशदीने मजूर वर्गात चांगलीच दहशत असल्याने मजूराचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतमालाचेही चांगलेच नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिकांचा वनविभागावर रोष असून तातडीने कुठलीही जीवित हानी होण्यापुर्वी वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी चेतन मॅकलवार, प्रफूल भोयर, राजू  मॅकलवार, राकेश गिसावार, राहूल बोलपेलवार, श्रीनिवास मॅकलवार, विजय चिटपेल्लिवार, नकुल सितर्लावार, आदी सह अनेक युवक उपस्थित होते .
Leave A Reply

Your email address will not be published.