सहविचार सभेत वणी तालुका तिरळे कुणबी समाजाची कार्यकारिणी गठीत

तालुका अध्यक्षपदी आशीष काळे तर सचिवपदी अशोक चौधरी यांची निवड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी तालुका तिरळे कुणबी समाज संघटनेची सहविचार सभा नुकतीच झाली. यात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. तसेच वणी तालुक्याची नूतन कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड या सभेत सर्वानुमते झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शांताराम ठाकरे होते. ज्येष्ठ समाजसेविका नीलिमा काळे, राजू देवडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या सभेत नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

त्यात अध्यक्ष आशीष काळे, सचिव अशोक चौधरी, उपाध्यक्ष राजू देवडे, सहसचिव वैशाली तावडे, कोषाध्यक्ष राहुल इंगोले, तर सदस्य म्हणून संतोष भेले, वैजनाथ खडसे, मनीष चौधरी, सचिन पोहेकर, सचिन ठाकरे, कार्तिक देवडे, सुमित्रा गोडे, वैशाली वातिले, सविता रासेकर, प्रसाद ठाकरे, मनोज चौधरी व प्रसिध्दी प्रमुख प्रशांत गोमकर यांची सर्वानुमते कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यामुळे तिरळे कुणबी समाज संघटनेच्या कामकाजाला गती मिळेल. नव्या जोमाने सामाजिक उपक्रमांना प्रारंभ होणार आहे. असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला. या सहविचार सभेचे संचालन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. या सभेला मोठ्या संख्येने कुणबी समाजबांधव उपस्थित होते.

Comments are closed.