रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

निर्गुडा नदीपात्रातून रेतीचे अवैधरित्या उत्खनन

बहुगुणी डेस्क, वणी: निर्गुडा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडले. पुनवट कवडशी रोडजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक ब्रास रेती, ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण 4 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ट्रॅक्टर कुणाच्या मालकीचा आहे, हे अद्याप कळू शकले नाही.

शिरपूर पोलिसांचे पथक मंगळवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान पहाटे 4 ते 4.30 वाजताच्या सुमारास पथकाला एक महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर (MH 29 AK 3166) पुनवट-कवडशी रोडने हायवेवर येताना पथकाला दिसला. त्यावेळी पथकाने ट्रॅक्टर चालकाला थांबण्याचा इशारा केला. वाहन थांबले. पथकाने चालकाला ट्रॉलीत (MH 29 BP 5423) काय आहे याची विचारणा केली. यावर चालकाने कवडशी शिवाराजवळ असलेल्या निर्गुडा नदीच्या पात्रातून आणलेली रेती असल्याची माहिती पथकाला दिली.

पथकाने रेतीची वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) बाबत विचारणा केली. मात्र चालकाजवळ परवाना आढळून आला नाही. त्यावरून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व आरोपी चालक प्रशांत देवराव बोन्डे रा. पुनवट ता. वणी याच्या विरोधात पर्यावरण (संरक्षण) अधिनियमच्या कलम 15, महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम 48(7) व बीएनएसच्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे. चालकावर गुन्हा दाखल झाला आहे मात्र सदर ट्रॅक्टर कुणाच्या मालकीचे आहे हे अद्याप कळू शकले नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.