बहुगुणी डेस्क, वणी: आपलं अपत्य शाळेतून घरी परत येईपर्यंत पालकांना धाकधूक असते. त्यातही नवनव्या वाहतुक साधनांची वाढ झाली. त्या गाड्यांची कागदपत्रे, आवश्यक पूर्तता याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या सुट्या संपून शाळा सुरू झाल्यात. शाळांचे २०२५-२०२६ हे शैक्षणीक सत्र सुरू झाले. त्यासोबतच विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांचीही वर्दळ वाढली.
बहुतांश शाळा, विद्यालयांमध्ये येणारे विद्यार्थी हे स्कूल बस, खाजगी बस, अॅटोने येणे-जाणे करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शुक्रवारी दिनांक ४ जुलै रोजी वाहतुक नियंत्रण उपशाखा वणी येथे सभा झाली. त्यात वणी शहरातील शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांची बैठक झाली.
पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी जाहीर केलेल्या एस.ओ.पी. प्रमाणे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यांची सुरक्षित वाहतुक व्हावी याबाबत बैठकीमध्ये सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये सर्व वाहनांची कागदपत्रे अद्यावत असावी. प्रत्येक वाहनाचा विमा, फिटनेस, परमीट अद्यावत असावे. वाहनात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवू नये. चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे. अशा सूचना करण्यात आल्या.
या सभेला उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण उपशाखा विजय महाले तसेच परीसरातील शाळा महाविद्यालयांचे प्रचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते. वाहतुक नियंत्रण उपशाखा वणी तर्फे सर्व पालकवर्ग व नागरीकांना विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या शाळेत पोहचविताना वाहतुक नियमांचे पालन करावे.
Comments are closed.