जितेंद्र कोठारी, वणी :- येथील सामाजिक संस्था स्माईल फाउंडेशनच्या वतीने येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. 7 मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी स्माईल फाउंडेशन च्या वतीने वणी शहरात आवश्यकतेनुसार निरनिराळ्या भागात या वर्षी 500 पेक्षा अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे.
5 जुलै रोजी वृक्षारोपण प्रसंगी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, येथील वार्ताहर परशुराम पोटे, जितेंद्र कोठारी, इंदू सिंग, स्माईल फाउंडेशन चे अध्यक्ष सागर जाधव, शाळा क्र. 7 चे मुख्याध्यापक गजानन कासावार यांच्या हस्ते खो-खो व कबड्डीच्या मैदानावर वड, कडुलिंब, चिंच व फळझाडे लावण्यात आली.
या प्रसंगी शिक्षकवृंद कल्पना मुंजेकर, चंदू परेकर, शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, विजय चव्हाण, दिगंबर ठाकरे व शाळेतील विद्यार्थी तसेच स्माईल फाउंडेशन चे सचिव आदर्श दाढे, उत्कर्ष धांडे, तन्मय कापसे, अनिकेत वासरीकर, मयूर भरटकर हे सदस्य उपस्थित होते.
Comments are closed.