उभ्या ट्रकवर धावता ट्रक आदळला; 4 जण जखमी

दोघांची प्रकृती गंभीर, सोमनाळा फाट्याजवळ रात्री भीषण अपघात

बहुगुणी डेस्क, वणी: नादुरुस्त होऊ उभ्या ट्रक असलेल्या एका ट्रकवर मागून दुसरा एक धावता ट्रक धडकला. या अपघातात ट्रकमध्ये असलेल्या चालकासह 4 जण जखमी झालेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास सोमनाळा फाट्यजवळ हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेले हे मजूर राजूर येथील असल्याची माहिती आहे. त्यांना रात्री उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. (अपडेट – यातील एका मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.)

रविवारी चालक प्रवीण बंडु मेश्राम (42) रा. राजुर कॉलरी हे ट्रकने (MH31GB3037) राजूर येथून विटा घेऊन पाटणबोरी येथे गेले होते. त्यांच्या सोबत 3 मजूर होते. विटांचा ट्रक खाली केल्यानंतर ते राजूर कडे येत होते. दरम्यान सोमनाळा फाट्याजवळ (MH46AF9483) हा ट्रक उभा होता. या उभ्या असलेल्या ट्रकला परत येणा-या धरधाव ट्रकची मागून जबर धडक बसली. या अपघातात ट्रकमध्ये असलेल्या चालकासह 4 जण जखमी झालेत.

जखमी झालेले 3 मजूर हे छत्तीसगड येथून कामासाठी राजूर येथे आलेले आहे. अपघातात कॅबिन चेंदामेदा झाली. यात दोघांच्या पायांना गंभीर इजा झाली. अपघातानंतर बराच वेळ हे जखमी ट्रकमध्येच होते. दरम्यान रस्त्यावरचे काही नागरिक बचावकार्यासाठी थांबले. त्यांनी याची माहिती निंबाळा व राजूर येथील काही लोकांना दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बचावकार्यासाठी निंबाळा येथील मनोज ढेंगळे व भूमेश पेंदोर हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने मारेगाव येथून ऍम्ब्युलन्स बोलावली. त्यांनी व घटनास्थळावरील लोकांच्या मदतीने जखमी मजुरांना बाहेर काढले व त्यांना उपचारासाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती वणी पोलिसांना देण्यात आली. अपघातातील दोघांच्या पायांना गंभीर इजा झाल्याची माहिती आहे. 

अपडेट- एका मजुराचा मृत्यू
दोन मजुरांची प्रकृती गंभीर होती. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन दोघांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र यातील चमन कुमरे (45) मुळ रहिवासी मध्यप्रदेश हल्ली मुक्काम राजूर याचा मृत्यू झाला. तर शाहरुख पठाण, प्रवीण मेश्रामसह एका मजुरावर उपचार सुरु आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

बंद ट्रकवर कोणतेही रिफ्लेक्टर नव्हते किंवा ट्रक बंद अवस्थेत ठेवल्यावर इंडिकेटर ऑन नव्हते. या प्रकरणी ट्रक चालक प्रवीण बंडु मेश्राम यांच्या तक्रारीवरून रस्त्यावर ट्रक उभ्या ठेवणा-या ट्रक पालकावर बीएनएसच्या कलम 285, 125(a),125(b) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजूर फाटा ते गौराळा, निंबाळ, सोमनाळा या दोन तीन किलोमीटरच्या रोडवर उभ्या ट्रकला धडक दिल्याने अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर आता पर्यंत शेकडो जण जखमी झाले आहेत. 

Comments are closed.