आज आयटीआयमध्ये उद्योजक्ता प्रशिक्षण व करीअर गायडंस वर्कशॉप

विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योग करु इच्छीणारे इत्यादींनी सहभागी होण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील शासकीय आयटीआय जत्रा रोड येथे आज बुधवारी दिनांक 19 जून रोजी करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते संध्या 5 पर्यंत हे शिबिर चालणार आहे. या शिबिरात करिअरच्या विविध संधी, उद्योजक्ता इत्यादी विषयी तज्ज्ञांतर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वणी यांचा वतीने ना. मंगल प्रभात लोढा मंत्री, कौशल्य विकास, रोजगार, यांच्या संकल्पनेतून या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला संजय राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, खा. प्रतिभा धानोरकर, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जी. यु. राजुरकर जि. व्य. शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, यवतमाळ हे राहणार आहे. तर नितीनकुमार हिंगोले उपविभागीय अधिकारी, वणी, एसडीपीओ गणेश किंद्रे, मुख्याधिकारी सचिन गाडे, डॉ. भालचंद्र चोपणे, ओमप्रकाश चचडा यांची कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.

स. 11 वाजता बौध्दिक मार्गदर्शन सत्राला सुरुवात होणार आहे. यात सुशिल बुजाडे, से.नि.जि.व्य.शि. व प्रशिक्षण अधिकारी, चंद्रपूर हे बेरोजगारी निर्मूलन म्हणजे कौशल्य विकास या वर मार्गदर्शन करणार आहे. प्रा. राम पंचभाई, दाते महाविद्यालय, यवतमाळ हे व्यक्तीमत्व विकास व करीअर कौन्सीलिंग, वैभव ठाकरे, संचालक ज्ञानदा स्पर्धा परिक्षा केंद्र, वणी हे स्पर्धा परिक्षा आणि मुलाखतीची तयारी, तेजस महानोर, व्यवस्थापक, युनियन बँक, वणी हे शैक्षणिक व व्यावसायिक कर्ज प्रक्रिया यावर राजेश पोटे, से.नि. मुख्याध्यापक राष्ट्रीय विद्यालय, मारेगांव विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास, रुपेश हिरुळकर, प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, यवतमाळ हे उद्योजकता, गजानन गहूकार, संचालक गजानन फर्निचर इंडस्ट्रिज, वणी हे यशोगाथा सांगणार आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संजय तेलतुमडे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वणी / झरीजामणी, राहुल पळवेकर प्राचार्य, औ.प्र. संस्था मारेगांव, विद्या शितोळे सहा. आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांनी केले आहे.

Comments are closed.