जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेत वणी शहर सर्वांत पुढे आहे. आरोग्य विभाग व नगर परिषद प्रशासन लसीकरण उद्दिष्ट साधण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. शहरातील एकही नागरिक लसीकरण पासून वंचित राहू नये या उद्देशाने नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या संकल्पनेतून शहरातील प्रत्येक प्रभागमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आज बुधवारी प्रभाग क्रमांक 3 मध्ये लसीकरण शिबिर राबवण्यात आले.
सोमवार 11 ऑक्टो. रोजी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आयोजित शिबिरात 125 नागरिकांनी लस घेतली. तर मंगळवार 12 ऑक्टो. रोजी प्रभाग क्रमांक 2 मध्ये लसीकरण शिबिरात 400 नागरिकांना लस देण्यात आली. प्रत्येक दिवस एक प्रभाग या योजनेनुसार आज बुधवार 13 ऑक्टो. ला प्रभाग क्रमांक 3 मध्ये कोरोना व्हॅक्सीन शिबीर आयोजित करण्यात आले होते. तिथे 167 व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली

उद्या गुरुवारी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी प्रभाग क्रमांक 4 मध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी दोन्ही डोज किंवा दुसरी डोज घेतली नाही, त्यांनी या शिबिरात येऊन लस घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले आहे.
हे देखील वाचा:
