नोकरीची संधी – ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये विविध पदांसाठी भरती
2026–27 शैक्षणिक सत्रासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित
वणी (बहुगुणी डेस्क): वणी येथील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल (BDIS) मध्ये 2026–27 शैक्षणिक सत्रासाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शाळेच्या नव्या कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारल्या जात असून, विशेषतः AI व रोबोटिक्स लॅब सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अनुभवी व उत्साही शिक्षक तसेच प्रशासकीय कर्मचारी यांची गरज निर्माण झाली आहे.
शाळेत लीडरशिप व अकॅडमिक्स विभागात ब्रँच इन्चार्ज (प्री-प्रायमरी), PGT (इंग्रजी व सायन्स), तसेच प्रायमरी व प्री-प्रायमरी शिक्षकांची आवश्यकता आहे. स्टुडंट सपोर्ट व को-करिक्युलर विभागात काउंसलर, क्रीडा, आर्ट अँड क्राफ्ट तसेच संगीत व नृत्य शिक्षकांसाठी संधी उपलब्ध आहे. याशिवाय अॅडमिनिस्ट्रेशन विभागात ऑफिस अॅडमिनिस्ट्रेटर, अकाउंटंट, रिसेप्शनिस्ट आणि कॉम्प्युटर ऑपरेटर पदांसाठीही भरती होणार आहे.
सर्व पदांसाठी उत्तम इंग्रजी संवाद कौशल्य व संगणक ज्ञान आवश्यक असल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपला सविस्तर बायोडाटा blackdiamondwani@gmail.com या ई-मेलवर पाठवावा किंवा https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfMqP4zIecASlebZmVO5Z-nSCmkGAWt59D9lyOwx4nzwxhU2A/viewform
या लिंकवरून ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे.
शाळेच्या प्राचार्य यांनी इच्छुक उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, अधिकाधिक पात्र उमेदवारांनी अर्ज करावा असे सांगितले आहे.

Comments are closed.