शहरात भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

सणासुदीच्या काळात गृहिणींचे बिघडले बजेट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आधीच कोरोनाच्या संकटाने व त्यात लागलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता कुठे तरी परिस्थिती हळूहळू सावरला लागली असताना महागाईने डोके वर काढायला सुरवात केली आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, डाळीच्या किमती वाढल्यानंतर आता ऐन सनासुदीच्या काळात भाजीपाल्याचे दरही गगणाला भिडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरातील महिलांचे महिन्याचे बजेट बिघडत आहे.

वणीतील चिल्लर बाजारात सध्या वांगे – 80 रु. किलो, बटाटे – 40 रु, किलो, कांदे – 50 रु किलो, टमाटर – 60 रु किलो, फुल कोबी – 80 रु किलो, पत्ताकोबी – 80 रु किलो, कारले – 60 रु किलो, शेंगा – 60 रु किलो, हिरवी मिरची – 80 रु किलो, अद्रक – 30 रु पाव या भावाने मिळत आहे. यात सर्वाधिक किंमत पालकची आहे. चांगल्या दर्जाची फ्रेश पालक सध्या 200 रु किलोने मिळत आहे.

आधीच पेट्रोल – 109, डिझेल – 91, गॅस सिलेंडर – 950, खाद्य तेल- 150, डाळ – 100-120 रुपये दराने मिळत असताना भाज्यांचे दरही वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांवर महागाईचा फटका सहन करत भाजी विकत घेण्याची वेळ आली आहे.

हे देखील वाचा:

काळी आहे म्हणत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ

नवरात्री ऑफर: सोनीच्या टीव्हीवर 30 % पर्यंतची सूट

Comments are closed.