वेगळ्या विदर्भासाठी 19 फेब्रुवारीपासून संपूर्ण विदर्भात यात्रा

हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या तोंडाला पुन्हा पाने पुसल्याचा वामणराव चटप यांचा आरोप

विवेक तोटेवार, वणी: 19 ते 30 डिसेंबरला राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे झाले. या अधिवेशनात विदर्भासाठी जलसंपदा विभागाचे एकही काम समाविष्ट करण्यात आले नाही. यातून विदर्भाचा द्वेष दिसून येत असल्याचा आरोप 4 फेब्रुवारी रोजी वणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप यांनी केला. वेगळ्या विदर्भाचे आंदोलन आणखी तीव्र करण्याचे जाहीर करत दिनांक 19 फेब्रुवारी 2023 ते 5 मार्च 2023 पर्यंत संपूर्ण विदर्भात वेगळ्या विदर्भासाठी यात्रा निघणार असल्याचे देखील चटप यांनी जाहीर केले. वणी येथए झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलेत होते.

वामनराव चटप म्हणाले की नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात अर्थमंत्र्याकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाच्या मागण्यातून विदर्भ गायब झाला असून कायम हद्दपार करण्यात आला आहे. दुर्दैवाने राज्याचे अर्थमंत्री व जलसंपदा मंत्री विदर्भातील मूळ गाव मुल इथले असताना नागपूर वरून राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी ‘कुऱ्हाडीचे दांडे गोतास काळ’ हा रोल पूर्णपणे अदा केल्याचे दिसून येत आहे.

विदर्भातील एकही काम या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाचे 1 काम दाखवा 1 लाख मिळावा अशी भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीने जाहीर केली आहे. अशा प्रकारचे फलक विदर्भातील जिल्ह्याजिल्ह्यात लावण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती चटप यांनी दिली.

जलसंपदा विभागाच्या पूरक मागण्या व विनियोजनात विदर्भातील 11 जिल्हे 120 तालुके व 62 विधानसभा मतदारसंघात जलसंपदा विभागाचे एकही काम समाविष्ट न करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अर्थनियोजन व जलसंपदामंत्री यांनी विदर्भ द्वेष आपल्या आचरणातून दाखवून दिलं आहे. त्यांच्या या कृतीचा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. पत्रकार परिषदेत विदर्भ जनआंदोलन समितीचे सदस्य हजर होते.

अशी निघणार वेगळ्या विदर्भासाठी यात्रा
19 फेब्रुवारी 2023 ते 5 मार्च 2023 पर्यंत पूर्वेकडील कालेश्वर (सिरोंचा) येथून 1 प्रचार यात्रा निघणार आहे. तर दुसरी प्रचार यात्रा जिजाऊचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा येथून निघणार आहे. या दोन्ही प्रचार यात्रेचा समोरोप 5 मार्च रोजी नागपूर येथे होणार आहे. या यात्रेतून समोरण विदर्भातील लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ऍड वामन चटप यांनी दिली.

Comments are closed.