सुमारे 2200 रुग्णांनी घेतला मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ

जितेंद्र कोठारी, वणी: भाजपचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव, कायर व वणी येथे भव्य मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. यात सुमारे 2200 रुग्णांनी सहभाग घेतला होता. श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव समितीद्वारा या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी शहरातील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानात संध्याकाळी 6 वाजता शहनाज अख्तर यांच्या भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी मारेगाव येथील सुविधा मंगल कार्यालय येथे झालेल्या मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शिबिरास सुमारे 600 रुग्ण सहभागी झाले होते. शुक्रवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी कोळी समाज मंदिर, कायर येथे झालेल्या शिबिरात 350 रुग्ण सहभागी झाले होते. तर वणीतील जैताई मंदिर येथे झालेल्या शिबिरात सुमारे 1200 रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी गरजू रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली. तसेच शस्त्रक्रियेची गरज असणा-या रुग्णांना सेवाग्राम येथे पाठवण्यात येणार आहे. रुग्णांचा संपूर्ण खर्च व व्यवस्था विजय चोरडिया यांच्या तर्फे केली जाणार आहे. 

शहनाज अख्तर यांची भजन संध्या
सोमवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी वणीतील शासकीय मैदान येथे सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांच्या भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहनाज ही मध्यप्रदेश येथील रहिवासी असून भजन गाणारी मुस्लिम गायिका म्हणून ती देशभरात प्रसिद्ध आहे. ‘मुझे चढ गया भगवा रंग’ हे तिचं गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. वयाच्या 10 व्या वर्षापासून ती भजन गात आहे.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावा – कुणाल चोरडिया
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मारेगाव, कायर आणि वणी येथील नेत्र चिकित्सा व मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबिराला रुग्णांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोमवारी होणा-या भजन संध्येलाही वणीकरांकडून उत्स्फुर्त प्रतिसादाची अपेक्षा आहे. 
– कुणाल चोरडिया, श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती, वणी

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, आदर्श महिला बहुउद्देशीय संस्था मारेगाव हे परिश्रम घेत आहे. भजन संध्येला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments are closed.